
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात, २२ वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसने शतक ठोकून इतिहास रचला आहे. त्याने पहिलं टी-२० आंतरराष्ट्रीय शतक ठोकून अनेक विक्रम मोडले आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिसने असा पराक्रम केला आहे जो दक्षिण आफ्रिकेचा कोणताही खेळाडू टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी करू शकला नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, देवाल्ड ब्रेविसने अवघ्या ४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. डेवाल्ड ब्रेविसने २२ वर्षे १०५ दिवसांच्या वयात हे शतक झळकावले. यासह, तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात कमी वयात शतक झळकावणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला आहे.
या सामन्यात डेवाल्ड ब्रेविसने अवघ्या ४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आता तो डेव्हिड मिलरनंतर दक्षिण आफ्रिकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक करणारा फलंदाज बनला आहे. डेव्हिड मिलरने ३५ चेंडूत शतक झळकावले.
डेवाल्ड ब्रेविसने अवघ्या ५६ चेंडूत १२५ धावांची नाबाद खेळी केली. आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कोणत्याही फलंदाजाने केलेले हे पहिले शतक आहे. यापूर्वी हाशिम अमलाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या टी-२० सामन्यात सर्वाधिक ९७ धावा केल्या होत्या.
डेवाल्ड ब्रेव्हिस आता दक्षिण आफ्रिकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने फाफ डू प्लेसिसचा विक्रम मोडला आहे. डू प्लेसिसने २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११९ धावांची खेळी खेळली होती, परंतु डेवाल्ड ब्रेव्हिसने नाबाद १२५ धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.