Earthquake In Ladakh: लडाख पुन्हा हादरले, रिश्टल स्केलवर 3.2 तीव्रता

लडाखमध्ये गुरुवारी (8 जून) ला रात्री 10.22 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Earthquake In Ladakh Magnitude 3.2 on the Richter scale: केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये गुरुवारी (8 जून) ला रात्री 10.22 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

याआधी 5 एप्रिलला भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 मोजण्यात आली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विट करून भूकंपाची माहिती दिली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6.54 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. जमिनीचा मध्यभाग जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता.

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com