आसाम आणि मिझोरम (Assam-Mizoram) सीमेवर सुरु असलेल्या वादात आसाम पोलीसांच्या (Assam Police) 6 जवानांचा मृत्यू आणि 50हून अधिक जवान जखमी झाल्यानंतर या प्रश्नाची आता केंद्र सरकारने दखल घेतली आहे. सीमेवर झालेल्या या वादानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा ट्विटरवर शाब्दीक चकमक झाल्याचे दिसुन आले होते. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी जखमी पोलिसांची भेट घेतली, तसेच मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. (Deployed two units of CRPF on Assam-Mizoram border)
काल झालेल्या मोठ्या संघर्षानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाने सीआरपीएफच्या दोन कंपन्या (आसाममध्ये 119 बटालियन आणि मिझोरममध्ये 225 बटालियन) आसम आणि मिझोरम दरम्यान लईलापूर-वैरंगे दंत या विवादित ठिकाणी तैनात केल्या आहेत. सीआरपीएफचे (CRPF) एडीजी संजीव रंजन ओझा यांनी सांगितले की, सीआरपीएफच्या दोन तुकड्या आधीच आसाम आणि मिझोरम पोलिसांच्या सोबत होत्या मात्र त्या तटस्थ होत्या.
दरम्यान, या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या देखील ट्विटरवर आरोप प्रत्यारोप झाल्याचे पहायला मिळाले आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा (CM Zoramthanga) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपाची मागणी करत या घटनेचा एक व्हीडीओ पोस्ट करुन लिहले आहे की, “हे थांबायला हवे.” तर दुसर्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “चहारमार्गे मिझोरमला परत जात असताना निर्दोष लोकांवर गुंडांनी हल्ला केला आणि त्यांच्या कारची तोडफोड केली.”
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.