सोमवारी आसाम-मिझोरम सीमेवर (Assam-Mizoram Border) पुन्हा हिंसाचार (Violence) भडकल्याचे पहायला मिळाले. सिमेवर झालेला संघर्ष आणि वाहनांवर हल्ला केल्याच्या घटना आज दिवसभर समोर आल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर ट्विट करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे ज्यामध्ये लोक लाठ्या काठ्या घेऊन हाणामारी करताना दिसता आहेत. या घटनेमुले दोन राज्यांमध्ये असणारा वाद पुन्हा उफाळल्याचे पहायला मिळते आहे.
मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा (CM Zoramthanga) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपाची मागणी करत या घटनेचा एक व्हीडीओ पोस्ट करुन लिहले आहे की, “हे थांबायला हवे.” तर दुसर्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “चहारमार्गे मिझोरमला परत जात असताना निर्दोष लोकांवर गुंडांनी हल्ला केला आणि त्यांच्या कारची तोडफोड केली.”
त्याचबरोबर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विट करून मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले- आदरणीय झोरमथंगाजी ... कोलासिब (मिझोरम) एसपी यांनी आम्हाला हिंसा थांबेपर्यंत पोस्ट वरुन हटण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार कसे चालवायचे आपणच सांगा, अपेक्षा आहे की आपण या प्रकरणात लक्ष घालुन हस्तक्षेप कराल.
आसामच्या मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या ट्विटला झोरमथंगा यांनी पुन्हा उत्तर दिले की, “माननीय अमित शहाजींच्या वतीने प्रिय हिमंताजी, मुख्यमंत्र्यांच्या सौहार्दपूर्ण बैठकीनंतर आश्चर्य म्हणजे आसाम पोलिसांच्या दोन कंपन्यांनी नागरिकांवर लाठीमार केला. एवढेच नव्हे तर आसाम पोलिसांनी नागरिकांवर अश्रुधुराचे गोळे फेकले. मिझोरम सीमेवरील सीआरपीएफ CRPF जवान आणि मिझोरम पोलिसांवरही (Mizoram Police) त्यांनी हल्ला केला.
आम्हाला सांगू की दोन शेजारील राज्यांमधील सीमा विवाद जुना आहे. 1995 पासून दोन्ही राज्यांमधील सीमावाद संपवण्यासाठी बर्याच चर्चा झाल्या आहेत पण काही उपयोग झाला नाही. मिझोरम, आयझाल, कोलासिब आणि ममित हे तीन जिल्हे आणि आसाम, काचार, करीमगंज आणि हैलकंदी ही तीन जिल्हे एकमेकांना लागून आहेत. दोन्ही राज्यांतील हे जिल्ह्यांच्या सीमा जवळपास 144 कि.मी पर्यंत जोडून आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.