Shraddha Walkar Murder Case: मोठी बातमी! अखेर आफताबवर आरोप निश्चित, पुरेसे पुरावे असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा

न्यायालयाने मंगळवारी आफताबवर खून आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप निश्चित केले आहेत.
Shraddha Walkar Murder Case
Shraddha Walkar Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला यांच्यावर दिल्लीतील साकेत न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. आफताबविरोधात श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी आफताबवर खून आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप निश्चित केले आहेत.

साकेत न्यायालयाने आरोपी आफताब अमीन पूनावाला यांच्यावर खून (302) आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी (201) आरोप निश्चित केले आहेत.

सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी पुरेसे पुरावे सादर केले आहेत, त्यामुळे प्रथमदर्शनी हत्येचा (302) गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुरावे नष्ट केले आहेत.

असे न्यायालयाने म्हटले आहे. यादरम्यान आरोपी आफताबने आपल्यावर लावलेले आरोपांचे खंडन केले आहे. तो या खटल्याला सामना करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

18 मे ते 18 ऑक्टोबर या दरम्यान पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तुम्ही तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मृतदेहाची विविध ठिकाणी विल्हेवाट लावली, हा पुरावा गायब करण्याचा गुन्हा आहे. असे न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

Shraddha Walkar Murder Case
Mumbai Goa Highway Accident: वाहतूक कोंडी अन् महाड येथे कोळशाचा ट्रक आणि एसटी बसचा अपघात; सातजण जखमी

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 75 दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते. आफताबची पोलिसांनी नार्को टेस्ट केली होती. याआधी पॉलीग्राफी चाचणीही झाली होती. त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. यानंतर हे आरोपपत्र तयार करण्यात आले.

तुमच्यावर श्रद्धाची हत्या आणि तिच्या शरीराच्या तुकड्यांची छतरपूर आणि इतर भागात विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे असे कोर्टाने आफताबला विचारले.

तसेच, तुम्ही स्वत:ला दोषी मानता की खटला चालवू इच्छिता? असे कोर्टाने आफताबला विचारले. त्यावर आफताबच्या वकिलाने त्याला खटला चालवयाचा असल्याचे सांगितले.

आफताब पूनावाला याने 18 मे रोजी दिल्लीतील छतरपूर भागात लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर मेहरौली परिसरात तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकले. असा आरोप त्याच्यावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com