POK साठी RSS च्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाची रॅली; इंद्रेश कुमार म्हणाले, 'ते' भारतीय होते... आहेत... आणि राहतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) आघाडीची संघटना असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने रविवारी दिल्लीत पाकव्याप्त काश्मीर (PoK) साठी तिरंगा यात्रा काढली.
Delhi Tiranga Yatra RSS Leader Indresh Kumar on PoK
Delhi Tiranga Yatra RSS Leader Indresh Kumar on PoKDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Tiranga Yatra RSS Leader Indresh Kumar on PoK: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) आघाडीची संघटना असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने रविवारी दिल्लीत पाकव्याप्त काश्मीर (PoK) साठी तिरंगा यात्रा काढली.

यावेळी मुस्लीम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक आणि केंद्रीय नेते इंद्रेश कुमार म्हणाले की, ही तिरंगा यात्रा पीओकेसाठी होती. कारण पीओकेला अनेक वर्षांपासून पाकिस्तानपासून वेगळे होऊन भारतात यावे असे वाटत आहे.

आजचे पीओके फाळणीच्या वेळी भारतात होते

इंद्रेश कुमार म्हणाले की, आजचे पीओके फाळणीच्या वेळी भारतात होते. तत्कालीन सरकारच्या चुकांमुळे ते पाकिस्तानच्या ताब्यात राहिले आणि युनोमध्ये वादात सापडले.

त्यावेळी, काँग्रेस (Congress) सरकार आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरु इंग्रजांच्या अशा चक्रव्यूहात अडकले होते की, चुका झाल्या. म्हणूनच आजचा मेळावा हा भारताच्या प्रगतीचा, प्रेमाचा, संरक्षणाचा आणि देशासाठी त्यागाचा आहे.

Delhi Tiranga Yatra RSS Leader Indresh Kumar on PoK
Pok भारताचा अविभाज्य भाग, नकाशा दाखवत युएईने पाकिस्तानला फटकारले

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या (India) विद्यमान सरकारचे विचार आणि संकल्प वाढवण्याची हीच वेळ आहे. कारण पीएम मोदी संसदेत म्हणाले होते की, जेव्हा ते जम्मू-काश्मीरबद्दल बोलतात तेव्हा त्यात पीओकेही येतो.

हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याची ही सुरुवात आहे. दरम्यान, सुरुवातही अशी असावी की ती शेवटपर्यंत पोहोचेल. हे वास्तवात बदलेल याचाच आजचा मेळावा पुरावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com