Sexual Assault: पडदे लावले अन्... चालत्या स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चालक-कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

Delhi Sexual Assault Case: एका धावत्या स्लीपर बसमध्ये 11वीत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली.
Delhi Sexual Assault Case
Sexual AssaultDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Sexual Assault Case: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका भयानक आणि धक्कादायक गुन्ह्याने हादरली. एका धावत्या स्लीपर बसमध्ये 11वीत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली. याप्रकरणी तात्काळ कारवाई करत दिल्ली पोलिसांनी बसचा चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांना अटक केली. ही दुर्घटना 4 ऑगस्टच्या रात्री घडल्याचे समोर आले असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्लीपर बस जप्त करुन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. कुटुंबातील वादाच्या कारणावरुन ती घरात कोणालाही न सांगता आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी नोएडाला येण्यासाठी निघाली होती. मुसळधार पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे ती चुकून नोएडामधील 'परी चौक' येथे उतरली. त्याचवेळी तिमारपूरकडे दुरुस्तीनंतर परतणारी एक रिकामी स्लीपर बस तिथे आली. चालक आणि कंडक्टरने तिला नोएडा सेक्टर-63च्या दिशेने सोडण्याचे आश्वासन देऊन बसमध्ये बसवले.

Delhi Sexual Assault Case
Goa Crime: गोव्यात गुन्हे वाढतायत, गोमंतकीयांच्या सुरक्षेचे काय? गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

बस सुरु झाल्यानंतर काही वेळातच कंडक्टरने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या जबाबानुसार, चालक आणि कंडक्टर या दोघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला आणि विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. स्लीपर बसला पडदे असल्याने बाहेरुन चालणाऱ्या कोणालाही आत घडणाऱ्या या भीषण प्रकाराची भनक लागली नाही. परी चौक ते काश्मिरी गेट दरम्यानच्या 47 किलोमीटरच्या प्रवासात हा अमानुष प्रकार घडला.

Delhi Sexual Assault Case
Crime News: इन्फ्लूएन्सरच्या मृत्यूनं खळबळ! जंगलात झाडाला बांधून जिवंत पेटवलं, लिव्ह-इन पार्टनरनेच कट रचल्याचा आरोप

बलात्कार केल्यानंतर नराधमांनी पीडितेला उशिरा रात्री काश्मिरी गेट बस टर्मिनसजवळील रिंग रोडवर फेकून दिले आणि तेथून पळ काढला. अत्यंत घाबरलेल्या स्थितीत पीडितेने काश्मिरी गेट पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिमारपूर येथील बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही बस सुरजपूर येथील वर्कशॉपमधून दुरुस्त करुन परत आणली जात असताना हा गंभीर गुन्हा घडल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com