DCW अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचा मोठा खुलासा, मी 4 वर्षांची असताना माझे वडील...

Delhi: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी शनिवारी एक मोठा खुलासा केला.
Delhi Commission For Women Chairperson Swati Maliwal
Delhi Commission For Women Chairperson Swati MaliwalDainik Gomantak

Delhi Commission For Women Chairperson Swati Maliwal: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी शनिवारी एक मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले होते. मालीवाल यांनी पुढे सांगितले की, जेव्हा मी फक्त चार वर्षांची होते, तेव्हा मी माझ्या वडिलांच्या लैंगिक शोषणाची शिकार झाले होते.

दरम्यान, महिला आयोगाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होताना स्वाती मालीवाल म्हणाल्या की, या कार्यक्रमाने मला प्रेरणा दिली, कारण महिला (Women) पुरस्कार विजेत्यांच्या संघर्षाच्या कथांनी मला स्वतःच्या संघर्षाची आठवण करुन दिली.

Delhi Commission For Women Chairperson Swati Maliwal
Swati Maliwal: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग!

वडील खूप मारायचे

स्वाती मालीवाल आपले बालपण आठवून भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांनी माझ्यावर 'लैंगिक अत्याचार' केले. मालीवाल पुढे म्हणाल्या की, "माझे वडील मला खूप मारायचे. ते घरी आल्यावर मी पलंगाखाली लपायचे, मला खूप भीती वाटायची.

अशावेळी महिलांना अशा अत्याचाराविरुद्ध कसे सक्षम बनवायचे या विचारात मी रात्रभर घालवत असे. ते माझे केस पकडून माझे डोके भिंतीवर आदळत असे. पण मला विश्वास आहे की, या घटनेने महिलांच्या कल्याणासाठी काम करण्याची जिद्द माझ्यात निर्माण झाली."

2020 मध्ये स्वाती मालीवाल यांचा घटस्फोट झाला होता

2015 मध्ये आम आदमी पार्टीचे सरकार (Government) स्थापन झाल्यानंतर लगेचच स्वाती मालीवाल दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या. नंतर त्यांची मुदत वाढवण्यात आली.

DCW चे नेतृत्व करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सल्लागार म्हणून काम केले. स्वाती मालीवाल यांचा विवाह हरियाणा आपचे माजी अध्यक्ष नवीन जयहिंद यांच्याशी झाला होता, पण 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Delhi Commission For Women Chairperson Swati Maliwal
K. Kavitha ED enquiry: तेलंगणाचे CM केसीआर यांच्या आमदार मुलीची आज ईडी चौकशी

दुसरीकडे, मालीवाल या सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. जानेवारीमध्ये, दिल्लीत महिलांवरील गुन्ह्यांच्या वाढीनंतर, मालीवाल यांनी रात्री दिल्लीतील सुरक्षा परिस्थितीची पाहणी करत असल्याचा दावा केला होता, जेव्हा एका मद्यधुंद कॅब चालकाने कारच्या खिडकीत त्यांचा हात बंद केला आणि त्यांना ओढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com