Arvind Kejriwal Arrested: केजरीवाल यांच्या अटकेच्या मुद्यावर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली प्रतिक्रिया; ''आम्हाला आशा आहे की...''

Delhi Excise Policy Case: आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा अटक केली.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Dainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Excise Policy Case:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यासोबतच कोर्टाने केजरीवालांना 6 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. केजरीवाल यांना आता 28 मार्च रोजी कोर्टात हजर केले जाणार आहे. दिल्लीतील कथित दारु घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी संध्याकाळी अटक केली. यातच आता, जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्हाला आशा आहे की, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मानके आणि मूलभूत लोकशाही तत्त्वांचे पालन या प्रकरणात होईल. केजरीवाल यांच्या अटकेला परदेशी मीडियाने अनेक प्रकारे कव्हर केले आहे.

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. भारत हा लोकशाहीवादी देश आहे. आम्हाला आशा आहे की, या प्रकरणात न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मानके, मूलभूत लोकशाही तत्त्वे देखील लागू होतील. याप्रकरणात आरोपांचा सामना करत असलेल्या केजरीवाल यांना निष्पक्ष सुनावणीचा पूर्ण अधिकार आहे. ते पुढे म्हणाले की, यात हे देखील समाविष्ट आहे की ते कोणत्याही निर्बंधाशिवाय सर्व आवश्यक कायदेशीर पर्यायांचा वापरु शकतात.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Arrested: केजरीवालांना कोर्टाचा मोठा धक्का; 28 मार्चपर्यंत सुनावली ईडी कोठडी!

परदेशी मीडियाने काय म्हटले?

त्याचवेळी, अमेरिकेतील प्रतिष्ठित मीडिया हाऊस न्यूयॉर्क टाइम्सने भारतीय विरोधी पक्षांचा हवाला देत एक लेख प्रसिद्ध केला, ज्यामध्ये टीकाकारांनी असा दावा केला आहे की केंद्र सरकार आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी अशी कारवाई करत आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निडणुकीपूर्वी विरोधकांचा अडसर दूर करण्याचा केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Arrested: मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आम आदमी पक्षाला झटका

अमेरिकन मीडिया हाऊसशिवाय शेजारील देश पाकिस्तानच्या द डॉन प्रसिद्ध वेबसाइटनेही केजरीवालांच्या अटकेचे कव्हरेज केले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी आपल्या कव्हरेजमध्ये म्हटले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत. दीर्घकाळ चाललेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या संदर्भात गुरुवारी केजरीवालांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्याचवेळी, डॉनने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा हवालाही दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com