Arvind Kejriwal Arrested: मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आम आदमी पक्षाला झटका

Delhi Excise Policy Case: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अखेर आज अटक करण्यात आली.
Arvind Kejriwal Arrested
Arvind Kejriwal ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अखेर आज अटक करण्यात आली. अटक टाळण्यासाठी केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावत मोठा झटका दिला होता. त्यानंतर काही वेळातच ईडीचे पथक 10 वे समन्स बजावण्यासाठी केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घराची झडती घेतली. यापूर्वी, ईडीने याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 9 समन्स पाठवले होते, मात्र ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. दरम्यान, केजरीवाल यांची कायदेशीर टीम सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. आता केजरीवाल यांच्या प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी करत मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा मिळणार नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर कलम 144 लागू केले. याशिवाय, कोणताही अनुचित प्रकार टाळता यावा यासाठी केजरीवाल यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. केजरीवाल यांच्या घरापासून अनेक मीटर अंतरावर बॅरिकेडिंग करण्यात आले.

Arvind Kejriwal Arrested
Delhi CM Arvind Kejriwal: पाच समन्स बजावूनही केजरीवाल हजर झाले नाहीत; ईडीची कोर्टात धाव

दुसरीकडे, आप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर रस्त्यावर बसून जोरदार निदर्शने केली. आपचे नेते सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक, पूर्व दिल्लीचे आमदार आणि लोकसभेचे उमेदवार कुलदीप कुमार हेही अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर पोहोचले होते. दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉयही तिथे पोहोचल्या. केजरीवाल यांना अटक झाल्यास संपूर्ण दिल्ली रस्त्यावर उतरेल, असे दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी म्हटले होते. अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क साधता येत नसल्याचे सौरभ भारद्वाज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले. त्यांचा फोन जप्त करण्यात आल्याचे देखील भारद्वाज म्हणाले. भारद्वाज यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त केली होती. मात्र अखेर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com