"दिल्ली रिमोट कंट्रोल": केजरीवालांनी घेतली पंजाबमधील अधिकार्‍यांची बैठक

भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने विरोधी पक्षांसोबत बैठक सुरु केली आहे.
Arvind Kejriwal & Bhagwant Mann, Arvind Kejriwal News, Bhagwant Mann News
Arvind Kejriwal & Bhagwant Mann, Arvind Kejriwal News, Bhagwant Mann NewsDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्य सचिव आणि पंजाब विद्युत विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक घेतल्यानंतर भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने विरोधी पक्षांसोबत बैठक सुरु केली आहे. केजरीवाल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असताना पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) मात्र उपस्थित नव्हते. पंजाबचे मुख्यमंत्री आज दुपारी 3 वाजता केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाब स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशनच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याचे वृत्त आहे. या बैठकीला पंजाबचे मुख्य सचिव आणि सचिव (Energy) देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीला भगवंत मान अनुपस्थित असल्याच्या वृत्तावरुन विरोधकांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. (Delhi Chief Minister Arvind Kejriwal held a meeting with top officials of the Punjab State Electricity Corporation)

दरम्यान, केजरीवाल दिल्लीतून रिमोट कंट्रोलद्वारे पंजाब चालवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा, माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu), भाजपचे मनजिंदर सिरसा आणि अकाली दलाचे दलजीत चीमा यांनी ट्विट करुन आप सरकारवर निशाणा साधला आहे. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिद्धू म्हणाले की, ''भगवंत मान यांच्या अनुपस्थितीत अरविंद केजरीवाल यांनी आयएएस अधिकाऱ्यांना बोलावले होते. यावरुन मुख्यमंत्री आणि दिल्लीच्या रिमोट कंट्रोलचा पर्दाफाश होतो. संघराज्याचे उल्लंघन करुन हा पंजाबचा अपमान आहे. यावर दोघांनाही उत्तर द्यावे लागेल.'' (Arvind Kejriwal News)

Arvind Kejriwal & Bhagwant Mann, Arvind Kejriwal News, Bhagwant Mann News
Congress News: सेवादलाचे दिल्लीतील कार्यालय काँग्रेस करणार रिकामे, आदेश जारी

तसेच, पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी ट्विट करत म्हटले की, "पंजाबचे 'वरिष्ठ अधिकारी' आता @अरविंद केजरीवाल साहिब यांच्या दरबारात हजर राहतील का? पंजाबचे मुख्यमंत्री @भगवंतमान जी केवळ नाममात्र आहेत का? याला ‘Reebok' शो म्हणतात. ‘Reebuk' ला पकडा.!

Arvind Kejriwal & Bhagwant Mann, Arvind Kejriwal News, Bhagwant Mann News
दिल्लीतील कोरोनास्थिती गंभीर..चाचण्या, कोविड वॉर्ड वाढवण्याचे आदेश

माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी लिहिले आहे की, ''मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पंजाबच्या IAS अधिकाऱ्यांना अरविंद केजरीवाल यांनी बोलावले आहे. भगवंत मान. यामुळे मुख्यमंत्री आणि दिल्ली रिमोट कंट्रोलचा पर्दाफाश होतो. हे संघराज्याचे स्पष्ट उल्लंघन आहे, पंजाबी अभिमानाचा अपमान आहे. दोघांचेही स्पष्टीकरण दिले पाहिजे."

याशिवाय, याप्रकरणी दिल्ली किंवा पंजाबमधून आम आदमी पक्षाच्या वतीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, भगवंत मान यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे.

https://www.kooapp.com/profile/AAPPunjab

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com