Delhi Blast: दिल्ली स्फोटात मोठा खुलासा! मोबाईल डेटाने उलघडला '26 जानेवारीचा कट'; लाल किल्ल्याची केली होती पाहणी

Red Fort Delhi blast Update: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात मोठे यश मिळाले असून, हल्ल्याचे नियोजन आणि पाहणीबाबत महत्त्वपूर्ण तपशील समोर आले
Delhi bomb blast
Delhi bomb blastDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात मोठे यश मिळाले असून, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून हल्ल्याचे नियोजन आणि पाहणीबाबत महत्त्वपूर्ण तपशील समोर आले आहेत. राजधानीत झालेल्याया स्फोटात एकूण १२ जण ठार झाले होते.

डॉक्टर दहशतवाद्यांकडून पाहणी

फरीदाबाद येथून कार्यरत असलेल्या एका दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित अटक करण्यात आलेला डॉ. मुजम्मिल गनाई याने चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. त्याने आणि डॉ. उमर नबी ऊर्फ डॉ. उमर मोहम्मद यांनी मोठ्या दहशतवादी कटाचा भाग म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची पाहणी केली होती. डॉ. मुजम्मिलच्या मोबाईल फोनमधून मिळालेल्या 'डंप डेटा'मधून तपासकर्त्यांना ही माहिती मिळाली आहे.

लक्ष्य २६ जानेवारी आणि दिवाळी

तपास यंत्रणेला चौकशीदरम्यान कळाले की, २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करणे ही त्यांची सुरुवातीची योजना होती. एवढेच नव्हे तर, या मॉड्यूलने दिवाळीदरम्यान गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी हल्ला करण्याचीही योजना आखली होती. पोलीस सूत्रांनुसार, डॉ. उमर नबी हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य होता. यात डॉ. मुजम्मिल आणि डॉ. आदिल अहमद दार यांचाही समावेश आहे.

Delhi bomb blast
Delhi Blast: कट उघड होण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीतील स्फोट? धागेदोरे फरिदाबाद-पुलवामात; संशयित डॉक्टरच्या DNA चे घेतले नमुने

'व्हाईट कॉलर' मॉड्यूलचा पर्दाफाश

लाल किल्ल्याजवळील स्फोट, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या 'व्हाईट कॉलर' (उच्चशिक्षित) दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर काही तासांतच झाला होता. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद या संघटनांशी संबंधित ८ लोकांच्या अटकेसह २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती.

'अपघाती' स्फोटाची शक्यता

मंगळवारी समोर आलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळील स्फोटाच्या प्राथमिक तपासात, आंतर-राज्य दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर, घाईघाईत तयार केलेले स्फोटक उपकरण नेताना 'अपघाताने स्फोट' झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "हा बॉम्ब अपरिपक्व होता आणि पूर्णपणे विकसित नव्हता, त्यामुळे त्याचा परिणाम मर्यादित होता. स्फोटामुळे कोणताही खड्डा पडला नाही आणि कोणतेही तुकडे आढळले नाहीत."

४० हून अधिक नमुने जप्त

फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) टीमने स्फोटस्थळावरून ४० हून अधिक नमुने गोळा केले आहेत, ज्यात जिवंत काडतुसांसह दोन काडतुसे आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या स्फोटकांचे नमुने आहेत. प्राथमिक विश्लेषणानुसार, स्फोटकांच्या नमुन्यांपैकी एक अमोनियम नायट्रेट असल्याचे दिसून आले आहे.

फरीदाबादमध्ये तपासणीदरम्यान डॉ. मुजम्मिल गनाई आणि डॉ. शाहीन सईदुल्हक यांच्या अटकेनंतर ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. दुसऱ्या स्फोटकाचा नमुना अमोनियम नायट्रेटपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे मानले जात आहे. स्फोटकांचा नेमका प्रकार आणि त्यांचा वापर कसा करण्यात आला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com