Fraud Case: इन्स्टाग्रामवर श्रीमंतीचा थाट, बोलण्यात प्रेम अन् लग्नाचं स्वप्नं! 23 वर्षीय तरुणाकडून 20 महिला कॉन्स्टेबलची फसवणूक; सर्व पीडित एकाच बॅचमधील

23 Year Old Man Marriage Fraud: दिल्लीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
23 Year Old Man Marriage Fraud
23 Year Old Man Marriage FraudDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Delhi Women Constables Fraud Case

दिल्लीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाने श्रीमंत व्यावसायिक असल्याचे भासवून महिला कॉन्स्टेबलना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सुमारे २० महिला कॉन्स्टेबल या प्रकरणात फसवणुकीच्या बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या महिला एकाच बॅचमधील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलातही चर्चेला उधाण आले आहे.

२४ लाखांच्या फसवणुकीचा आरोप; बुराडी येथून आरोपीला अटक

या प्रकरणातील आरोपीचे नाव विक्रांत तोमर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याला दिल्लीतील बुराडी परिसरातून अटक करण्यात आली. करोल बाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलची लग्नाचे आश्वासन देऊन तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या तक्रारीच्या तपासादरम्यान आरोपीने इतर महिला कॉन्स्टेबलनाही लक्ष्य केल्याची माहिती पुढे आल्याचे वृत्त आहे.

इन्स्टाग्रामवर श्रीमंत व्यावसायिक असल्याचे भासवायचा

आरोपी सोशल मीडियाचा वापर करून महिलांशी संपर्क साधत असल्याचा आरोप आहे. इन्स्टाग्रामवर महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैलीशी संबंधित व्हिडीओ शेअर करून तो स्वतःला श्रीमंत व्यावसायिक असल्याचे दाखवत असे. त्याच्या या प्रतिमेमुळे महिला त्याच्यावर विश्वास ठेवत असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन विविध कारणांसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप आहे.

लिव्ह-इन पार्टनरच्या ओळखीतील महिलांना लक्ष्य केल्याचा संशय

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीची लिव्ह-इन पार्टनरदेखील दिल्ली पोलीस दलात महिला कॉन्स्टेबल असल्याचे वृत्त आहे. तिच्या बॅचमधील इतर महिला कर्मचाऱ्यांची माहिती मिळवून आरोपी त्यांच्याशी संपर्क साधत असल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे ओळखीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून महिलांना आर्थिक व्यवहारांसाठी तयार केले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

23 Year Old Man Marriage Fraud
Goa Cricket News: गोव्याचा मोसमातील पहिला विजय! कर्नल नायडू करंडकात बिहारला 174 धावांनी धूळ चारली

भाड्याने महागड्या गाड्या घेऊन दाखवायचा आलिशान जीवनशैली

महिला कॉन्स्टेबलना फिरायला नेण्यासाठी आरोपी आठ तासांच्या कालावधीसाठी महागड्या गाड्या भाड्याने घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या गाड्यांमधून वेगवेगळ्या महिलांना फिरवून तो स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे भासवत असे, असा आरोप आहे. काही वेळा एका महिलेकडून दुसऱ्या महिलेसोबत फिरण्यासाठी लागणारा खर्चही वेगवेगळी कारणे सांगून घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

23 Year Old Man Marriage Fraud
Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

फसवणुकीच्या पैशांसाठी बेटिंग अ‍ॅपच्या खात्याचा वापर?

या प्रकरणातील पैशांच्या व्यवहारांसाठी वनएक्स बेटिंग अ‍ॅपशी संबंधित खात्याचा वापर झाल्याचा आरोप आहे. या आर्थिक व्यवहारांची साखळी तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, या व्यवहारांबाबतची संपूर्ण माहिती तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

आरोपीविरोधात आधीपासून पाच गुन्हे दाखल

विक्रांत तोमरविरोधात दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीसंदर्भात पाच एफआयआर दाखल असल्याचे वृत्त आहे. मायापुरी, हरीनगर, इंद्रपुरी आणि पूर्व जिल्हा सायबर पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्याविरोधात प्रकरणे नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी जून महिन्यात जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्याचेही सांगितले जाते.

आणखी महिला तक्रार देण्याची शक्यता

सुमारे २० महिला कॉन्स्टेबल या फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली असली, तरी सर्व पीडित महिलांनी अद्याप अधिकृत तक्रार दाखल केलेली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तपासादरम्यान आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता आहे. मध्य जिल्हा सायबर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आर्थिक व्यवहार आणि आरोपीने इतर महिलांशी साधलेल्या संपर्कांची चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com