ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 Loan Apps; 80 लाखांहून अधिक लोकांना बनवले शिकार!

Fraud Loan Apps: देशात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घोटाळेबाज ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून लोकांना लाखोंचा गंडा घालतायेत.
Fraud Loan Apps: ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 Loan Apps; 80 लाखांहून अधिक लोकांना बनवले शिकार!
Fraud Loan AppsDainik Gomantak
Published on
Updated on

Fraud Loan Apps: देशात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घोटाळेबाज ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून लोकांना लाखोंचा गंडा घालतायेत.

याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. असे काही बनावट ॲप्स सापडले आहेत, ज्याच्या माध्यमातून घोटाळेबाज लोकांची फसवणूक करतायेत.

McAfee च्या ताज्या रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांत अशा ॲप्सच्या माध्यमातून लोकांची मोठ्याप्रमाणात फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. लोन देण्याचे आमिष दाखवून अशा घोटाळेबाजांनी अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. हे घोटाळेबाज ॲप वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्सची चोरी करतात.

हे 15 लोन ॲप्स तात्काळ डिलीट करा!

मॅकफीच्या रिपोर्टनुसार, 15 बनावट लोन ॲप्स सुमारे 8 दशलक्ष म्हणजेच 80 लाख वापरकर्त्यांनी डाउनलोड केले आहेत. बहुतेक वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरचे आहेत. तथापि, यापैकी काही ॲप्स स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत.

Fraud Loan Apps: ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 Loan Apps; 80 लाखांहून अधिक लोकांना बनवले शिकार!
Online Shopping Fraud: गोलमाल है भाई सब गोलमाल है! दिवाळीत मागवला लॅपटॉप मिळाला दगडाचा तुकडा

चुकूनही परवानगी देऊ नका

काही ॲप्स अजूनही वापरकर्त्यांच्या फोनमध्ये उपलब्ध आहेत. ॲप स्टॉल झाल्यावर हे घोटाळेबाज अनेक प्रकारच्या परवानग्या मागतात. यासाठी तुम्हाला मेसेज, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनचा ॲक्सेस द्यावा लागतो. मात्र अनेकजण विचार न करता त्यासाठी परवानगी देतात. एकदा ॲपला अॅक्सेस मिळाल्यानंतर, बँकिंगसाठी (Banking) आवश्यक असलेल्या वन-टाइम पासवर्डसह तुमचा महत्त्वाचा डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो.

अशा ॲप्सची संपूर्ण यादी पाहा

तुम्हीही हे ॲप्स वापरत असाल तर लगेच डिलीट करा. खाली आम्ही अशा ॲप्सची यादी दिली आहे.

Préstamo Seguro-Rápido, seguro

Préstamo Rápido-Credit Easy

ได้บาทง่ายๆ-สินเชื่อด่วน

RupiahKilat-Dana cair

ยืมอย่างมีความสุข – เงินกู้

เงินมีความสุข – สินเชื่อด่วน

KreditKu-Uang Online

Dana Kilat-Pinjaman kecil

Cash Loan-Vay tiền

RapidFinance

PrêtPourVous

Huayna Money

IPréstamos: Rápido

ConseguirSol-Dinero Rápido

ÉcoPrêt Prêt En Ligne

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com