Odiaha Train Accidecent
Odiaha Train AccidecentDainik Gomantak

Balasore train accident: ओडिशा रेल्वे अपघाताची धग कायम; मृतांची संख्या अजूनही वाढतेय

बालासोर रेल्वे अपघातातील आणखी एक बळी ओडिशातील कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला.
Published on

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९१ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी नुकतीच ही माहिती दिली. 35 वर्षीय अपघातग्रस्त शोएब मन्सूरचा कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे एससीबी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सुधांशू शेखर मिश्रा यांनी सांगितले.

13 जखमी आयसीयूमध्ये

एससीबी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सुधांशू शेखर मिश्रा म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 205 रूग्णांपैकी 46 रूग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत, त्यापैकी 13 अतिदक्षता विभागात आहेत. “आयसीयूमध्ये असलेल्या 13 रुग्णांपैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.”

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव 21 जून रोजी ओडिशातील बालासोरला भेट देणार आहेत, जिल्ह्य़ात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या दोन आठवड्यांनंतर. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा दौरा होत असून, त्यादरम्यान भाजप नेते देशभरातील योग उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. रेल्वे अपघाताच्या कठीण काळात लोकांच्या बचावासाठी आलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचीही केंद्रीय मंत्री भेट घेऊन आभार मानतील.

Odiaha Train Accidecent
Heatstroke Deaths : उष्माघाताचा कहर! 80 जणांचा मृत्यू, शेकडोजण रुग्णालयात दाखल

बालासोर रेल्वे अपघातानंतर पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली. ओडिशातील रायगड जिल्ह्यातील अंबाडोलाजवळ शनिवारी मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. याच्या काही दिवसांपूर्वी बालासोर येथे रेल्वे रुळावरून घसरून २९१ जणांचा मृत्यू झाला होता तर ११०० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी कालाहंडीतील अंबाडोला येथून लांजीगडमधील वेदांत प्लांटकडे जात असताना ही घटना घडली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Odiaha Train Accidecent
"फक्त युरोपियन लोकांसारखे..." गृहमंत्र्याचा महिलांना वादग्रस्त सल्ला

मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वे रुळावरून घसरण्याचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा ओडिशातील बालासोर येथील अपघाताच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com