"फक्त युरोपियन लोकांसारखे..." गृहमंत्र्याचा महिलांना वादग्रस्त सल्ला

तेथे उपस्थित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनीही या निर्णयावर संताप व्यक्त केला.
European Women
European WomenDainik Gomantak
Published on
Updated on

तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. महिलांनी युरोपातील लोकांसारखे कपडे घालू नयेत, त्यामुळे समस्या निर्माण होतात, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री महमूद अली म्हणाले की, महिला त्यांना पाहिजे ते परिधान करू शकतात परंतु लहान कपडे नको. ते म्हणाले,

आमचे धोरण पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. तुम्हाला हवे ते परिधान करू शकता परंतु युरोपियन लोकांसारखे कपडे घालू नका, यामुळे गोष्टी बिघडू शकतात. इस्लामला मानणाऱ्या महिला धर्मानुसार कपडे घालतात. हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या महिला पल्लूने आपले डोके झाकतात. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात, तर जेव्हा महिला पूर्ण कपडे घालतात तेव्हा सर्व व्यवस्थित असते.
मोहम्मद महमूद, गृहमंत्री तेलंगणाचे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादमधील एका कॉलेजने विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले होते त्या घटनेला उत्तर देताना तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केले होते.

European Women
PM Modi in USA : मोदी अमेरिकेत, तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये! जागतिक राजकारण ढवळून निघणार

कॉलेजमध्ये काय झालं?

खरं तर, शुक्रवारी हैदराबादच्या केव्ही रंगा रेड्डी पदवी महाविद्यालयात परीक्षा केंद्रात पोहोचलेल्या विद्यार्थिनींनी आरोप केला की कर्मचाऱ्यांनी त्यांना बुरखा घालून परीक्षेला बसू देण्यास नकार दिला. मुस्लीम विद्यार्थिनींनीही सांगितले की, त्यांना परीक्षेला बसण्यापूर्वी प्रतीक्षा करावी लागली.

एका विद्यार्थ्याने सांगितले की,

'कॉलेज प्रशासनाने आम्हाला बुरखा न घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ते परीक्षेच्या नियमांच्या विरोधात आहे. आमच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार गृहमंत्री महमूद अली यांच्याकडे केली. ज्यावर ते म्हणाले की, बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना केंद्रात येऊ न देणे योग्य नाही.

European Women
Heatstroke Deaths : उष्माघाताचा कहर! 80 जणांचा मृत्यू, शेकडोजण रुग्णालयात दाखल

कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींना सुमारे अर्धा तास परीक्षा हॉलमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तेथे उपस्थित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनीही या निर्णयावर संताप व्यक्त केला. मात्र नंतर विद्यार्थ्यांना त्यांचे बुरखे उतरवावे लागले आणि त्यानंतरच त्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com