कर्नाटकमध्ये सरकारी शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडला मृत सरडा, 80 विद्यार्थी आजारी
कर्नाटकातील (Karnataka) हावेरी जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्याने सुमारे 80 विद्यार्थी आजारी पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अन्नामध्ये मृत सरडा आढळून आला होता. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी घडली असून सर्व आजारी विद्यार्थ्यांना राणीबेन्नूर येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
निष्काळजीपणाच्या या घटनेप्रकरणी जिल्हा प्रशासनाने शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोकांनी प्रशासनाला सांगितले की, 27 डिसेंबर रोजी वेंकटपुरा तांडा गावातील एका सरकारी शाळेत जेवण दिले जात असताना एका मुलाला सांबरात एक मेलेला सरडा दिसला. त्यानंतर त्यांनी लगेचच सर्वांना सांगितले. मात्र काही वेळातच काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊन आजारी पडू लागले.
पुण्यातील (pune) एका प्रशिक्षण संस्थेतील 30 मुलींनी ख्रिसमस पार्टीमध्ये काही खाद्यपदार्थ खाल्ल्याने पोटदुखी आणि मळमळ झाल्याची तक्रार केल्यावर हा अहवाल समोर आला आहे, त्यानंतर काही विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना ओपीडी स्तरावर उपचार देण्यात येत आहेत. पुण्याचे सिव्हिल सर्जन डॉ.अशोक नांदपूरकर म्हणाले की, अन्नातून विषबाधा झाल्याची ही संशयित घटना आहे.
अन्न आणि पाण्याचे नमुने घेतले जात आहेत
अशोक नांदपूरकर म्हणाले, “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, मुलींनी ख्रिसमस पार्टीमध्ये पनीरपासून बनवलेले पदार्थ खाल्ले होते. त्यापैकी काहींनी सोमवारी पोटदुखी, मळमळ आणि उलट्या झाल्याची तक्रार केली. एकूण 22 मुलींना भोर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सात विद्यार्थिनींना दाखल करण्यात आले असून उर्वरितांवर ओपीडी स्तरावर उपचार सुरू आहेत. उर्वरित विद्यार्थिनींना ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व 30 मुलींची प्रकृती स्थिर आहे, अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले जात आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.