Triple Talaq: मुलगी झाली...', पतीने दिला फोनवरुन तिहेरी तलाक, उज्जैनमध्ये FIR दाखल

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील उज्जैनमधून तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे.
Muslim Women
Muslim WomenDainik Gomantak

Triple Talaq: मध्य प्रदेशातील उज्जैनमधून तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. इथे मुलीच्या जन्मानंतर पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी पतीविरुद्ध मुस्लिम विवाह पर्सनल लॉ अतर्गंत उज्जैनमधील महाकाल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनच्या महाकाल पोलीस (Police) स्टेशन परिसरात राहणारी आयशा हिचा विवाह जावेदसोबत 22 जून 2021 रोजी झाला होता. लग्नानंतर लगेचच आयेशा गरोदर राहिल्यानंतर तिची आई शबाना तिला प्रसूतीसाठी घरी घेऊन आल्या. आयशाने 26 मे 2022 रोजी एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मामुळे तिचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय आनंदी झाले होते, मात्र या नवजात मुलीला पाहण्यासाठी पती किंवा सासरकडील कोणीही आले नाही. 30 जुलै रोजी आयेशाच्या मोबाईलवर जावेदचा फोन आला आणि जुन्या कारणावरुन भांडण सुरु असतानाच त्याने फोनवर तीनदा तलाक म्हणत आयेशाशी संबंध तोडले.

Muslim Women
'बंदूक का जवाब बंदूक से मिलेगा,' Tamil Nadu च्या राज्यपालांनी पाकला भरला दम!

दुसऱ्या बहिणीलाही घटस्फोटाची नोटीस आली

पतीवर आरोप करताना आयशाने महाकाल पोलिस ठाण्यात सांगितले की, 'माझं आणि माझी बहीण अल्फियाचे लग्न जावेद आणि जफर या दोन सख्या भावांसोबत रतलाममध्ये झाले. लग्नानंतर आमचा हुंड्यासाठी छळ केला जात होता, मात्र घरच्यांच्या सांगण्यावरुन हे संबंध आम्ही पुढे घेऊन जात होतो.'

आयशाने पुढे सांगितले की, 'जावेदने मला फोनवरुन घटस्फोट दिला, तर अल्फियाला तिचा पती जफरने दोन महिन्यांपूर्वी घटस्फोटाची (Divorce) नोटीस पाठवली.' आयशाने या संपूर्ण प्रकरणी पती जावेदविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर जावेदने तिहेरी तलाक दिल्याचे रेकॉर्डिंगही महाकाल पोलिस ठाण्यात आयशाने दिले आहे.

Muslim Women
Tamil Nadu: 12 वी तील विद्यार्थिनीची आत्महत्या; CM स्टालिन यांनी केली खास अपील

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

महाकाल पोलिस स्टेशनचे प्रभारी मुनेंद्र गौतम यांनी सांगितले की, 'या प्रकरणी तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रतलामला रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारदाराने ऑडिओ क्लिपही दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com