Uttar Pradesh: "तुम्हाला काय करायचं ते करा..." बॉयफ्रेंडसाठी मुलगी थेट वडिलांविरुद्ध पोलिसांत

Ayodhya News: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. लोक प्रेमात अशा प्रकारे बुडून जातात की ते आदर, प्रतिष्ठा आणि नातेसंबंधांची पर्वा करत नाहीत.
Ayodhya News
Ayodhya NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Ayodhya News: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. लोक प्रेमात अशा प्रकारे बुडून जातात की ते आदर, प्रतिष्ठा आणि नातेसंबंधांची पर्वाही करत नाहीत. असाच एक प्रकार यूपीच्या अयोध्या जिल्ह्यातही समोर आला आहे, जिथे एका मुलीने 'प्रेमासाठी' वडिलांना तुरुंगात पाठवले. प्रेमात अडसर ठरणाऱ्या बापाविरोधात मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली.

दरम्यान, ही बाब शहरात चर्चेचा विषय़ ठरली आहे. पुरा जमुनिया मौ गावातील एका मुलीने वडिलांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये तिने आरोप केला आहे की, तिच्या वडिलांनी तिच्या प्रियकराशी बोलल्याबद्दल तिला बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या आरोपावरुन पोलिसांनी (Police) तात्काळ तिच्या वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली.

Ayodhya News
Uttar Pradesh News: 'हे' महाविद्यालय देणार कर्मकांडाचे शिक्षण, विद्यार्थ्यांना मिळणार 16 संस्कारांचे धडे

मुलगी वडिलांना म्हणाली - 'तुम्हाला जे करायचे ते करा'

मंगळवारी रात्री ही तरुणी तिच्या प्रियकराशी बोलत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिचे वडील तिथे पोहोचले आणि तिला बोलण्यासापासून रोखू लागले, त्यामुळे रागाच्या भरात मुलीचा (Girl) संयम सुटला आणि मी बोलेन असे सांगितले. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. यानंतर मुलीने तिच्या प्रियकराला बोलावले आणि त्याच्यासोबत त्यांना पोलिसात घेऊन गेली, जिथे तिने वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवली.

Ayodhya News
Uttar Pradesh Crime: माणुसकी ओशाळली! 65 वर्षीय व्यक्तीने केला 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार अन् नंतर...

पोलिसांनी समजावले, पण...

पोलिस तिला खूप समजावत होते तू हे करु नकोस, हे तुझे वडील आहेत, पण प्रेमात अखंड बुडालेल्या मुलीने आपल्या नात्याचा त्याग केला आणि ती आपल्या वडिलांवर कायदेशीर कारवाई करण्यावर ठाम राहिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर कलम 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात पाठवले. हे संपूर्ण प्रकरण सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Uttar Pradesh Double Murder News
Aligarh Murder Case Over Money
Fatehpur Police Half Encounter Sonu Yadav
Uttar Pradesh Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com