DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार 'इतक्या' टक्क्यांनी वाढवणार महागाई भत्ता, पगार किती रुपयांनी वाढणार?

DA hike for central government employees: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.
DA hike for central government employees
DA hike for central government employeesDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. जर हा निर्णय झाला, तर सुमारे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारक यांना थेट लाभ मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी होणार घोषणा

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जुलै २०२५ साठी असलेली डीए वाढ सरकार सणासुदीच्या आधी लागू करू शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५५% महागाई भत्ता मिळतो. परंतु जर ही वाढ झाली, तर तो ३% ने वाढून ५८% होईल.

DA hike for central government employees
Goa: 'देशात अघोषित आणीबाणी! यावर आवाज कोण उठवणार'? सुब्रमण्यम यांचा सवाल; फिफ्टी इयर्स ऑफ इंडियन इमर्जन्सीचे प्रकाशन

या निर्णयामुळे थेट ५० लाखांहून अधिक कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढणार आहे. सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै या दोन कालावधीत डीए वाढ जाहीर करते. जानेवारीतील वाढ याआधीच लागू करण्यात आली आहे, परंतु जुलैची वाढ अद्याप प्रलंबित आहे. दिवाळीपूर्वी ही घोषणा झाली तर लाखो कुटुंबांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी ठरेल.

महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार?

सध्या सरकार आठव्या वेतन आयोगाचा आराखडा तयार करत असताना, सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार महागाई भत्ता वाढवला जात आहे. गेल्या काही महिन्यांत महागाई थोडी कमी झाली असली तरी, CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers) च्या आकडेवारीनुसार ३% वाढीची शक्यता सर्वाधिक आहे.

महागाई भत्ता कसा ठरतो?

महागाई भत्ता ठरवण्यासाठी सरकार दरमहा CPI-IW च्या आकडेवारीचा आधार घेतं. महागाईत जितकी वाढ, तितकीच डीएमध्ये वाढ केली जाते. उदाहरणार्थ, जर ६ महिन्यांत महागाई ५% ने वाढली असेल, तर डीएमध्येही ५% वाढ केली जाते. त्यामुळे या वेळी ३% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

DA hike for central government employees
Goa Crime: कायदा व पोलिसांचा धाक उरला नाही का? ‘हिस्ट्रिशिटर्स’ची गुन्हेगारी वाढली; राज्यात यावर्षी सुमारे 11 गंभीर घटना

कोणाचा पगार किती वाढेल?

जर महागाई भत्ता ३% ने वाढवला गेला, तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये थेट फरक पडणार आहे.

  • प्रवेश स्तरावरील कर्मचाऱ्याचा (१८,०००) पगार: सध्या त्याला महागाई भत्त्याच्या स्वरूपात सुमारे ९,९०० मिळतात. ३% वाढ झाल्यानंतर हे १०,४४० रूपये होईल. म्हणजेच वार्षिक ६,४८० रूपयांची वाढ.

  • उच्च पगार श्रेणीतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हजारो रुपयांनी वाढणार असून, यामुळे त्यांचं वार्षिक उत्पन्न लक्षणीयरीत्या जास्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com