DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

DA Hike Latest Update: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांचे लक्ष सध्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीच्या निर्णयाकडे लागले आहे.
DA Hike Latest Update
DA Hike Latest Update:Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांचे लक्ष सध्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीच्या निर्णयाकडे लागले आहे. जुलै ते डिसेंबर 2026 या सहामाहीसाठी केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ जाहीर होण्याची अपेक्षा आहे. अधिकृत घोषणा होण्यासाठी अजून काही आठवड्यांचा कालावधी असला, तरी उपलब्ध आर्थिक निर्देशांक आणि तज्ज्ञांच्या अंदाजांवरून यावेळी महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

AICPI निर्देशांकामुळे वाढीची शक्यता बळकट

महागाई भत्ता निश्चित करताना औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) महत्त्वाची भूमिका बजावतो. यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत या निर्देशांकात सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे जून महिन्याचाही निर्देशांक वाढीचा राहिल्यास महागाई भत्त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता अधिक बळकट होईल.

सध्याच्या अंदाजानुसार, महागाई भत्ता 60 टक्क्यांवरून वाढून 63 किंवा 64 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र अंतिम निर्णय हा सरकारकडून अधिकृत आकडेवारी आणि शिफारशींचा आढावा घेतल्यानंतरच जाहीर केला जाणार आहे.

DA Hike Latest Update
Goa Kamdhenu Scheme: सुधारित 'कामधेनू' योजना सुरू; गाय खरेदीसाठी 90.75 टक्क्यांचे अनुदान- मुख्यमंत्री डॉ.सावंत, दूध व्यावसायिकांना वाढीव दूध दर फरकाचे वितरण

याआधी किती झाली होती वाढ?

यावर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करत तो 58 टक्क्यांवरून 60 टक्के केला होता. हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आला. या वाढीचा लाभ सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक निवृत्त पेन्शनधारकांना झाला होता. संरक्षण, रेल्वे आणि इतर केंद्रीय विभागांतील कर्मचारी व निवृत्त अधिकारी यांचाही त्यात समावेश आहे.

महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनाशी जोडलेला असल्यामुळे त्याचा परिणाम केवळ मासिक पगारावरच होत नाही, तर भविष्य निर्वाह निधी (PF), पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि इतर आर्थिक लाभांवरही होतो. त्यामुळे DA वाढीचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

DA Hike Latest Update
Goa PMFBY: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत मोठा बदल; नव्या नियमामुळे ऊस ,भुईमूग शेतकरी चिंतेत

8 व्या वेतन आयोगाकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष

महागाई भत्त्याबरोबरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष 8 व्या वेतन आयोगाच्या कामकाजाकडेही लागले आहे. आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षी सरकारकडे सादर होण्याची अपेक्षा असून त्यानंतर नवीन वेतनरचनेबाबत प्रक्रिया सुरू होईल. मात्र यापूर्वीच्या वेतन आयोगांचा अनुभव पाहता, शिफारशी लागू होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो.

अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष

महागाई वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यंदाही चांगल्या वाढीची अपेक्षा आहे. AICPI-IW च्या अंतिम आकडेवारीनंतर सरकार महागाई भत्त्याबाबत निर्णय जाहीर करेल. तोपर्यंत 3 ते 4 टक्के वाढीचे अंदाज चर्चेत असले, तरी अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आता सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com