DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता; 'या' महिन्यांत होऊ शकते घोषणा

DA hike for central government employees: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येत्या काळात एक मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.
DA Hike
DA HikeDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येत्या काळात एक मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) वाढ करत तो ६० टक्क्यांवर नेला होता. आता जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या पुढील महागाई भत्ता वाढीचे वेध लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार जुलै २०२६ चा महागाई भत्ता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.

देशातील लाखो सरकारी कर्मचारी सध्या ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीच्या रोडमॅपची वाट पाहत आहेत. मात्र, ८ वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी, ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी एक वाढ केली जाऊ शकते. जर ही नवीन वाढ लागू झाली, तर कर्मचाऱ्यांचा एकूण डीए ६० टक्क्यांवरून थेट ६३ टक्के होईल, ज्यामुळे त्यांच्या मासिक वेतनात आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळेल.

DA Hike
CM Fellowship Goa: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 20 जागा; तरुणांना शासनाच्या विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी

का वाढतेय महागाई भत्ता वाढीची आशा?

श्रम ब्युरोने औद्योगिक कामगारांसाठी जारी केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI-IW) नवीन आकडेवारीमुळे या वाढीला बळकटी मिळाली आहे. एप्रिल २०२६ मध्ये हा निर्देशांक ०.८ अंकांनी वाढून १४९.९ वर पोहोचला आहे. हा वाढता आलेख बाजारातील सातत्यपूर्ण महागाई दर्शवतो. यामुळेच कर्मचाऱ्यांना महागाईच्या प्रभावापासून दिलासा देण्यासाठी सरकारकडून भत्त्यात सुधारणा केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

कशी होते महागाई भत्त्याची गणना?

सरकारी नियमांनुसार, कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा खर्च सुसह्य करण्यासाठी वर्षातून दोनदा (१ जानेवारी आणि १ जुलै) महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. याची गणना गेल्या १२ महिन्यांच्या CPI-IW च्या सरासरीच्या आधारे होते.

सन २०२६ च्या पहिल्या चार महिन्यांत या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. एप्रिलच्या आकडेवारीनुसार, डीए ६२.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जर मे आणि जून महिन्यातील आकडेवारी अशाच प्रकारे राहिली, तर हा अंतिम आकडा ६३.७२ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सरकार ३ टक्के वाढीसह महागाई भत्ता ६३ टक्क्यांवर निश्चित करेल अशी अपेक्षा आहे.

पगारात आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ?

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (Basic Salary) १८,००० रुपये असेल, तर सध्या ६०% दराने त्याला १०,८०० रुपये डीए मिळतो. ६३% डीए झाल्यास हा भत्ता ११,३४० रुपये होईल, म्हणजेच दरमहा ५४० रुपयांची थेट वाढ होईल.

सहा महिन्यांचा विचार केला तर हा फायदा ३,२४० रुपये असेल. याचप्रमाणे मूळ वेतन २५,५०० रुपये असलेल्यांना ७६५ रुपये, ३५,४०० रुपये असलेल्यांना १,०६२ रुपये आणि ४४,९०० रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा १,३४७ रुपयांचा अतिरिक्त फायदा होईल.

DA Hike
Goa Dam Water Level: प्रमुख धरणांतील जलपातळी घसरली! प्रशासनाची चिंता वाढली; मान्सून लांबल्याने पाणीटंचाईचे सावट

दुसरीकडे, पेन्शनधारकांसाठीही (DR) हाच नियम लागू असेल. ९,००० रुपये किमान पेन्शन घेणाऱ्यांना आता दरमहा २७० रुपये अधिक मिळतील, तर २५,००० रुपये पेन्शन घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शनमध्ये ७५० रुपयांची वाढ पाहायला मिळू शकते. वाढत्या घरगुती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी ही वाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com