Cyclone Biparjoy in India: 'बिपरजॉय' गुजरातला धडकले

सौराष्ट्र, कच्छमध्ये मुसळधार पाऊस; वीज खंडित
Cyclone Biparjoy in India
Cyclone Biparjoy in IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Cyclone Biparjoy in India: अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले. यावेळी वादळातील वाऱ्यांचा वेग १४५ किमी प्रतितास इतका होता, तर वादळ १५ किमी वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरवात झाली असून येथे सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. वादळ धडकण्याची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ मागील दहा दिवसांपासून वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत होते. चक्रीवादळ दुपारी धडकण्याचा पूर्वीचा अंदाज होता. प्रत्यक्षात ते संध्याकाळी धडकण्यास सुरुवात झाली.

यावेळी वादळ जखाऊ बंदरापासून ७० किलोमीटर दूर समुद्रात होते. समुद्रातून वादळ पूर्णपणे जमिनीवर सरकण्यास किमान चार तास लागतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

हे श्रेणी-३ मधील वादळ आहे. चक्रीवादळाच्या डोळ्याची, म्हणजेच केंद्रबिंदूची रुंदी ५० किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकताना वाऱ्याचा वेग वाढत जाईल, असे डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले. कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर, जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

निसर्गाचा उद्रेक

1 गुरूवारी (15 जून) सकाळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय कच्छमधील जाखौ बंदरापासून 180 किलोमीटर अंतरावर होतं, तर देवभूमी द्वारका आणि नलियापासून २१० किलोमीटर अंतरावर होते.

2 हे वादळ ईशान्य दिशेने सरकत असून ते गुरुवार संध्याकाळनंतर अतितीव्र होईल. वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना धोक्याची सूचना दिली.

3 यामध्ये किनारी भागातील केरळ, महाराष्ट्र आणि गुजरातसह राजस्थानलाही अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, बिपरजॉय आता ईशान्य दिशेने पुढे जात आहे.

Cyclone Biparjoy in India
Duleep Trophy 2023 : हेमंत आंगले दक्षिण विभागाचे मुख्य प्रशिक्षक

४७ हजार लोकांंनी केले स्थलांतर

कच्छ जिल्ह्यातल्या ४७ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना पर्यायी निवारा केंद्रांमध्ये नेले आहे.

गरोदर महिलांची सोय रुग्णालये आणि अन्य सुरक्षित ठिकाणी केली आहे. शून्य हानी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी ते जिथे आहेत तिथे सुरक्षित राहावे, प्रवास करू नये.

गुजरातमध्ये पडझड

सध्या या वादळामुळे गुजरातच्या किनारी भागातील वातावरण वेगाने बदलले आहे. द्वारका, जामनगर, मोरबी आणि राजकोट परिसरातील जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस आणि वेगवान वारे वाहत आहेत.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या माहितीनुसार, अनेक गावांमध्ये विजेचे खांब कोसळून पडले आहेत.

Cyclone Biparjoy in India
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांमध्ये वाढ, दक्षिण गोव्यातील दरांत घट; वाचा आजच्या किमती

पाकिस्तानला फटका

अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आज (१५ जून) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरात किनाऱ्यावर धडकले.

जाखौ बंदराजवळ लॅण्डफॉल होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रात्री उशिरापर्यंत ते सुरू राहील. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे.

मुंबईत उंचच उंच लाटा : गुजरातसह मुंबईतील परिस्थितीही बिकट होत आहे. किनारी भागातील चौपाट्यांवर जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या किनारी भागावरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात याचा प्रभाव दिसून येत आहे. येथील तटबंदीवर जोरदार लाटा आदळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com