लष्करी अधिकाऱ्यांकडून सायबर सुरक्षेचा भंग, उच्चस्तरीय चौकशी सुरू

देशातील गुप्तचर संस्थांनी काही लष्करी अधिकार्‍यांनी सायबर सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याची गंभीर बाब समोर आली
Cyber crime
Cyber crime Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील गुप्तचर संस्थांनी (cyber security breach) काही लष्करी (Military) अधिकार्‍यांनी सायबर सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याचा थेट संबंध शेजारील देशांकडून या माध्यमातून हेरगिरी करण्यासाठी वापर करण्यात आला असल्याशी जोडला जात आहे. सायबर सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरती एएनआयशी बोलताना संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, "लष्करी आणि गुप्तचर संस्थांनी काही लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सायबर सुरक्षा उल्लंघनाचा शोध लावला आहे, या माध्यमातून शेजारील देशांकडून हेरगिरी करण्यात आली असण्याची शक्यता आहे."

संरक्षण सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर सुरक्षा उल्लंघनाशी संबंधित घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोप झालेल्या अधिकार्‍यांवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्यासाठी तात्काळ चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ही चौकशी प्रगती पथावर आहे. यात एकमेकांच्या गुप्त माहिती देवाणघेवाणाचीच्या प्रकरणांमध्ये समावेश असलेल्या लष्करी अधिकार्‍यांवर ऑफिशीअल सिक्रेट्स अॅक्टद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.

Cyber crime
कृष्णभूमीत दारु अन् मांस विक्रीवर बंदी कायम, अलाहाबाद कोर्टाने फेटाळली याचिका

या प्रकरणी अधिक माहिती विचारली असता, संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, प्रकरणाची संवेदनशीलता आणि तपासाचे स्वरूप यामुळे या प्रकरणात अधिक माहिती देता येणार नाही. मात्र कोणतीही अफवा पसरणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. तसेच ज्या माहितीमधून या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होईल अशाही बातम्या, माहिती किंवा अफवा यांबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Cyber crime
जहांगीर परिसरात ड्रोनचा वापर; सुरक्षा दलांचा फौज फाटा तैनात

अलिकडच्या काळात, संशयित पाकिस्तानी आणि चिनी गुप्तहेर अधिकारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लष्करी कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याकडून लष्करी आणि त्यांच्या भविष्यातील योजनांबबद्दल संवेदनशील माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे बहुसंख्य प्रयत्न अयशस्वी ठरले असले तरी, त्यांच्या जाळ्यात सापडलेल्या काही लष्करी जवानांची माहिती काढण्यात ते यशस्वी झाले आहेत. दरम्यान अधिकार्‍यांना वेळोवेळी अशी प्रकरणे रोखण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना ठरवून दिलेल्या कार्यप्रणाली आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com