तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय? वस्तूच्या डिलिव्हरीनंतर करू नका ही चूक; पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल

तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता का? निश्चितपणे सवलतीच्या हंगामात तुम्ही दाबून ऑनलाईन शॉपिंग करत असाल.
Online Shopping
Online ShoppingDainik Gomantak
Published on
Updated on

तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता का? निश्चितपणे सवलतीच्या हंगामात तुम्ही दाबून ऑनलाईन शॉपिंग करत असाल.

पण जेव्हा तुमचे प्रोडक्ट डिलिव्हर होते, तेव्हा तुम्ही बॉक्स किंवा पॅकेट आणि बिलावर लिहिलेल्या तुमच्या वैयक्तिक माहितीसह ते कचरापेटीत टाकता का? जर होय असेल, तर तुम्हाला तुमची ही सवय बदलण्याची गरज आहे.

होय, आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीच्या नवीन पद्धतीही शोधल्या गेल्या आहेत. स्कॅमर तुम्ही कचर्‍यात टाकलेल्या बॉक्स/पॅकेटमधून तुमची वैयक्तिक माहिती चोरु शकतात, तुमची सायबर फसवणूक होऊ शकते.

विश्वास बसत नसेल तर ऑनलाइन खरेदीदारांना जागरुक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहा. या व्हिडिओने अनेकांचे डोळे उघडले आहेत.

डिलिव्हरी बॉक्स फेकण्यापूर्वी हे काम करा

दरम्यान, हा व्हिडिओ 1.27 मिनिटांचा आहे. त्याची सुरुवात एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाने होते - आपण आपली डिलिव्हरी पॅकेजेस तितक्या काळजीपूर्वक हाताळतो का? पाहूया.

डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीला (नियमित ऑनलाइन खरेदीदार) पॅकेट वितरित करतो हे क्लिपमध्ये पाहिले जाऊ शकते. त्यानंतर ग्राहक (Customer) पॅकेज अनबॉक्स करतो, प्रोडक्ट पॅकेटमधून बाहेर काढतो आणि रिकामा बॉक्स घराबाहेर कचरापेटीत टाकतो.

तितक्यातच एक स्कॅमर गुपचुपपणे ग्राहकाची माहिती असलेला बॉक्स उचलतो. अशा परिस्थितीत, स्कॅमर ग्राहक सेवक म्हणून व्यक्तीला कॉल करतो आणि पुढच्या व्यक्तीला विश्वासात घेवून त्याच्याकडून OTP मागतो.

यातच, दिल्ली पोलिसांनी मेसेज दिला की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा OTP देण्याची चूक करु नका.

ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरीनंतर त्यांची वैयक्तिक माहिती असलेला बॉक्स फेकून देण्यापूर्वी नेहमी मिटवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा.

Online Shopping
State Bank of India FD Scheme: SBI ने ग्राहकांना पुन्हा दिली खूशखबर, 'या' योजनेत आता जबरदस्त फायद्यांसह...

सायबर फसवणुकीबद्दल जागरुक केले

दुसरीकडे, 16 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणुकीबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल (@DelhiPolice) वरुन एक व्हिडिओ पोस्ट केला.

त्याच्या कॅप्शनमध्ये, त्यांनी लिहिले की, तुमच्या ऑनलाइन ऑर्डरनंतर सायबर फसवणूक अशा प्रकारे होऊ शकते. सायबर क्राइम कायदा 1930 किंवा http://cybercrime.gov.in वर तक्रार करा.

यासोबतच त्यांनी सायबर सिक्युरिटी आणि सायबर सेफ इंडिया हे हॅशटॅगही वापरले आहेत. या ट्विटला आतापर्यंत 35 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 300 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्संनी जागरुकता पसरवल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com