Crime News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युपीतील बलिकेचा मृतदेह शेजारच्या सापडला घरात.
Crime News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युपीतील बलिकेचा मृतदेह शेजारच्या सापडला घरात.Dainik Gomantak

खुलण्या आधीच बालिकेचे अस्तित्व नष्ट झाले..!

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युपीतील बलिकेचा मृतदेह शेजारच्या सापडला घरात.
Published on

Crime News : उत्तर प्रदेशातील (UP) हापूर शहरातील घरातून गुरुवारी संध्याकाळी बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलीचा (Crime News) मृतदेह आज सकाळी शेजारच्या घरात एका ट्रंकमध्ये भरलेल्या अवस्थेत सापडला. हापूर एसपी सर्वेश कुमार मिश्रा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार मृतदेह (Death Body) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हे बलात्काराचे प्रकरण आहे का असे विचारले असता, शवविच्छेदन (post-mortem) निकालाच्या आधारेच याची पुष्टी करता येईल असे ते म्हणाले.

Crime News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युपीतील बलिकेचा मृतदेह शेजारच्या सापडला घरात.
वाहतुकीच्या नियमांचे कराल उल्लंघन तर...!

"काल आम्हाला एक मुलगी हरवल्याची बातमी मिळाली होती, आज आम्हाला शेजारच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. म्हणून आम्ही एक टीम पाठवली पण दरवाजाला कुलूप असल्याचे आढळून आले. आम्ही कुलूप तोडले आणि फील्ड युनिटसह इमारतीत प्रवेश केला. दरम्यान अशी माहिती श्री मिश्रा यांनी दिली. या नंतर ते म्हणाले,

"इमारतीत प्रवेश केला आणि झडती घेतली तेव्हा आम्हाला एका ट्रंकमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत," घरमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओ फुटेज मध्ये संबंधित मालक मुलीला घेऊन जाताना दिसत आहे. संतप्त गावकऱ्यानी त्याला मारहाण केली. दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्याला जमावतून सोडवून घेऊन गेले.

Crime News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युपीतील बलिकेचा मृतदेह शेजारच्या सापडला घरात.
Omicron ची लक्षणे वेगळी आहेत, जाणून घ्या काय म्हणाले डॉक्टर?

व्हिडिओ फुटेजमध्ये घटनाक्रम कैद

संबंधित मुलीचा मृतदेह एका मोठ्या धातूच्या ट्रंकमध्ये इतर कपड्यांसह भरलेला आढळून आला मुलीच्या वडिलांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या मुलीला शेवटचे पाहिले, तिने त्यांच्याकडे ₹ 5 मागितले. त्यांनी तिला पैसे दिले, त्यानंतर ती काही वस्तू खरेदी करू इच्छित असल्याचे सांगून घरातून निघून गेली, सायंकाळी 5.30 च्या सुमारास हा प्रकार घडला.

"ती संध्याकाळपर्यंत ती परत आली नाही. काळजीने आम्ही रात्रभर तिचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) आम्ही पोलिसांत तक्रार नोंदवली आणि पुन्हा पूर्ण दिवस तिला शोधण्यात घालवला,"

वडिलांनी सांगितले की परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून शेजारी आपल्या मुलीला घेऊन जात असल्याबद्दल त्यांना कळले होते. वडिलांनी सांगितले की, त्याने मुलीला आरोपींनी प्रथम मोटारसायकलवरून आणि नंतर त्याच्या घरी नेल्याचे पाहिले. मुलीचा अजून वैद्यकीय अहवाल समोर अल नसून, पोलिसांनी संबंधीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com