वाहतुकीच्या नियमांचे कराल उल्लंघन तर...!

केंद्रीय मोटारवाहन (Central motor vehicle) कायद्याची राज्यात अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबतची अधिसूचना ही जारी झाली आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी  सुरु
केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु Dainik Gomantak
Published on
Updated on

वाहन चालवताना (driving) रहा सावधान, बरेच लोक वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विना परवाना, फॅन्सी नंबरप्लेट, बेदरकारपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास आता ते चांगलेच महागात पडणार आहे. नव्या केंद्रीय मोटारवाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबतची अधिसूचना ही जारी झाली आहे.

नियम मोडल्यास किती असेल दंड:

नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची (Act) अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने सार्वजनिक वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामध्ये केंद्राने यावेळी दंडात्मक रक्कमेमध्ये मोठी वाढ केली आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी  सुरु
Indian Navy Day 2021: देशात साजरा केला जातोय नौदल दिन, जाणून घ्या ऑपरेशन ट्रायडेंट

नवीन कायद्यानुसार दंड कसा असेल?

  • गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नसेल तर यापूर्वी 200 रूपये दंड होता त्याची वाढ होऊन तो आता 1000 रूपये असेल.

  • हेल्मेट घेतले नसल्यास 200 रुपये दंड होता तो आता 1000 रूपये असेल तसेच तीन महिन्यांपर्यंत वाहन परवाना देखील रद्द होईल.

  • परवाना नसेल तर 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 3 महिन्यांचा तुरूंवास किंवा यापैकी दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच हा गुन्हा परत केला तर 10 हजार रूपये दंड किंवा एक वर्षांची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

  • गाडीला बरेचजण हैस म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावतात. अश्यासाठी यापूर्वी 200 रुपये दंड होता आता तो 1 हजार रुपये असेल. तसेच हा गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास दरवेळी 1500 रुपयांचा दंड भरावा लागेल.

  • परवाना रद्द केलेले असेल आणि तसेच वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

  • भरधाव वेगात गाडी चालवली तर 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.

  • सिग्नल मोडल्यास 5 ते 10 हजार रुपये दंड किंवा 6-12 महिने तुरुंगवासाची शिक्षा असेल.

  • मोठ्याने किंवा कर्कश हॉर्न वाजवल्यास सुरुवातीला 1 हजार रूपयांचा, आणि तसेच दुसऱ्यांदा केल्यास 2 हजार रुपये दंड असेल.

  • वाहनाला विमा संरक्षण संपल्यास किंवा नसल्यास 2 हजार रूपय दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास असेल.

  • रुग्णवाहिके चा रस्ता अडवल्यास 10 हजार रूपये किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा असतील.

  • अल्पवयीन व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याला दोषी न धरता वाहनाच्या मालकला दोषी ठरविले जाणार आणि 25 हजार रूपये दंडासोबत 3 वर्षांचा तुरूंवास आणि गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल.

  • मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 6 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा असतील. तसेच हा गुन्हा पुन्हा केल्यास 15 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com