Asia Cup: आशिया कप संघाच्या घोषणेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार फलंदाज जखमी

Ishan Kishan injury: वेगवान गोलंदाज आकाशदीप आणि इशान किशन दुखापतीमुळे पहिल्या सामन्यास मुकणार आहेत. या दोघांचा पूर्व विभागात समावेश असून, त्यांचा सलामीचा सामना उत्तर विभागाविरुद्ध होणार आहे.
Akash Deep injury update
Akash Deep NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कोलकाता: वेगवान गोलंदाज आकाशदीप आणि इशान किशन दुखापतीमुळे दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यास मुकणार आहेत. या दोघांचा पूर्व विभागात समावेश असून, त्यांचा सलामीचा सामना उत्तर विभागाविरुद्ध होणार आहे.

दुलीप करंडक स्पर्धेस २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड दौऱ्यात आकाशदीपला पाठीच्या दुखण्याचा त्रास झाला होता. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांस त्याला मुकावे लागले होते. अंतिम सामन्यात तो खेळला, परंतु अजूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही, परिणामी दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तो खेळणार नाही.

दुलीप करंडक स्पर्धेतील उर्वरित सामन्यातही आकाशदीप खेळण्याबात साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत तो पूर्ण पणे तंदुरुस्त होणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे असणार आहे.

Akash Deep injury update
Akash Deep: इंग्लिश फंलदाजांची दाणादाण उडवणारा आकाश दीप किती संपत्तीचा मालक आहे?

दरम्यान, अगोदर जाहीर करण्यात आलेल्या निवडीनुसार इशान किशनची पूर्व विभागाच्या कर्णधापदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु बाइकवरून घसरून पडल्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली होती. तोही त्यातून अद्याप बरा झालेला नाही.

Akash Deep injury update
Akash Deep: वडील-भाऊ कोरोनात गेले, बहिण कॅन्सरशी लढतेय; दुःखाचं ओझं बाजूला ठेवत एजबॅस्टनवर आकाश दीपचा 'दीप' तेवला

पूर्व विभागाचा संघ ः अभिमन्यू इस्वरन (कर्णधार), रियान पराग (उपकर्णधार), संदीप पटनाईक, विराट सिंग, दिनेश दास, श्रीदम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र, आशीवार्द स्वाईन, उत्कर्ष सिंग, मानिशी, सुरज सिंधू जयस्वाल, मुकेश कुमार, मुख्तार हुसैन आणि मोहम्मद शमी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com