Manish Jadhav
एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने एकूण 10 विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात आकाश दीपने 4 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने 6 विकेट्स घेतल्या. या सामन्याच्या समाप्तीनंतर आकाश दीपचे नाव सर्वत्र चर्चेत आहे.
चला तर मग इंग्लंडविरोधी शानदार कामगिरी करणारा आकाश दीप किती संपत्तीचा मालक आहे ते जाणून घेऊया...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश दीपची एकूण मालमत्ता 30 ते 40 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तो बीसीसीआयचा ग्रेड सी श्रेणीचा खेळाडू असून त्याला वार्षिक 1 कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय, त्याला प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी वेगळे शुल्क मिळते. याशिवाय, त्याला आयपीएलमधूनही मोठी रक्कम मिळते.
आकाश दीप 2022 पासून आयपीएल संघाचा भाग आहे. 15 व्या हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले. तो 3 हंगामांसाठी आरसीबी संघाचा भाग होता.
या दरम्यान त्याने 60 लाख रुपये कमावले आणि 7 विकेट्स घेतल्या. 18व्या हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 8 कोटी रुपयांना खरेदी करुन संघाचा भाग बनवले.
आकाश दीपच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आयपीएल करार आणि बीसीसीआय करार आहे.
याशिवाय, त्याला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) कडून वार्षिक पगार मिळतो. त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी फी देखील मिळते. त्याच्याकडे काही ब्रँड्सची एंडोर्समेंट देखील आहेत. या सर्व माध्यमातून आकाश दीप खूप पैसे कमवत आहे.