सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India Pvt. Ltd.) सीईओ अदार पूनावाला यांनी बुधवारी सांगितले की, कोविड-19 लस कोवोव्हॅक्स 12 वर्षांवरील सर्व लहान मुलांना उपलब्ध करण्यात येत आहेत. लोकांनी जेव्हाअदार पूनावाला यांना विचारले की ही लस कोवोव्हक्स लस प्रौंडासांठी उपलब्ध आहे का? तेव्हा त्यांनी सांगितले की ही कोवोव्हॅक्स लस 12 वर्षांवरील सर्व लहान मुलांसाठी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी मंगळवारी अदर पूनावाला यांनी ट्विट केले होते की नोव्हावॅक्सने विकसित केलेले कोवोव्हॅक्स आता भारतात मुलांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. ते म्हणाले की भारतात उत्पादित केलेली ही एकमेव लस आहे जी युरोपमध्येही विकली जाते आणि तिची प्रभावीता 90 टक्क्यांहून अधिक आहे. (Covovax Covid-19 vaccine available to everyone over 12 years Adar Poonawala)
Covovax (Novavax), आता भारतात मुलांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. भारतात उत्पादित केलेली ही एकमेव लस आहे जी युरोपातही विकली जाते आणि तिची परिणामकारकता 90 टक्के एवढी आहे. आमच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणखी एक लस उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेशी हे सुसंगत आहे,” असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या आठवड्यात, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या Covovax COVID-19 लस 12-17 वयोगटासाठी मंजूर केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, सरकारने कोवोव्हॅक्सला आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी मंजुरी दिली होती.
कोवोवॅक्स - अदर पूनावाला 12 वर्षांवरील प्रत्येकासाठी उपलब्ध कॉर्बेवॅक्स आता 12 ते 14 वयोगटातील मुलांना लागू केले जात आहे. लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) ने 12-17 वयोगटातील मुलांना कोविड लसीचा डोस देण्याची शिफारस केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारताच्या औषध नियामकाने गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी कोवोव्हॅक्सला प्रौढांमधील आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी मान्यता दिली होती आणि 9 मार्च रोजी काही अटींच्या अधीन राहून 12-17 वयोगटातील वापरास परवानगी दिली होती. सध्या 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्स ही जैविक ई लस दिली जाते, तर 15-18 वयोगटातील बालकांना भारत बायोटेकद्वारे सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.
त्याचवेळी, गेल्या महिन्यात, अदार पूनावाला यांनी, सरकारी स्तरावर मान्यता मिळण्यास विलंब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, लहान मुलांना लस देण्याच्या परवानगीसाठी अनेक महिन्यांपासून वाट पाहत असल्याचे सांगितले. एका कार्यक्रमाला संबोधित करताना आदर पूनावाला म्हणाले होते की वेळेवर निर्णय घेण्यासाठी जबाबदार लोक आणि समित्यांची वृत्ती हे दर्शवते की त्यांना घाई नाही. महामारीविरुद्धच्या लढाईत ज्या गतीने आम्हाला इथपर्यंत आणले ते आता हरवले आहे, असेही ते म्हणाले. असे दिसते की त्यांच्यासाठी सर्व काही सामान्य झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.