Covid19: EPF सदस्यांना मेडिकल इमर्जन्सीसाठी काढता येणार 1 लाखांपर्यंतची रक्कम

मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे लागले तर इतर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. कारण कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपये ईपीएफ (EPF) मधून तात्काळ देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना आता (EPF) मधून एक लाख रुपये ईपीएफ तात्काळ देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना आता (EPF) मधून एक लाख रुपये ईपीएफ तात्काळ देण्यात येणार आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनासह (Covid 19) इतर कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी आपल्याला पैसे लागतात. यासाठी अनेक जण कर्ज काढणे उधार घेणे किंवा साठवलेले पैसे खर्च करतात. पण तरी अनेकदा पैसे कमी पडतात, मात्र आता मेडिकल इमर्जन्सीसाठी (medical emergencies) पैसे लागले तर इतर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. कारण कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपये (One lakh rupees) ईपीएफ (EPF) मधून तात्काळ देण्यात येणार आहे.

ईपीएफच्या सदस्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यातही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला बिल दाखविण्याची देखील गरज नाही. रुग्णालयात दाखल केल्याची कागदपत्रे दाखविल्यानंतर ही रक्कम त्या सदस्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. मागिल महिन्यात 1 जूनला ईपीएफने एक पत्रक जारी केले होते. त्यानुसार कोरोनासह इतर कोणताही आजार असल्यास जर कोणाला रुग्णालयात दाखल केले तर ईपीएफच्या सदस्यांना याचा फायदा मिळेल. असे या पत्रकात सांगण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना आता (EPF) मधून एक लाख रुपये ईपीएफ तात्काळ देण्यात येणार आहे.
Indian Army NCC Recruitment 2021: 56 हजारापर्यंत असणार पगार, असा करा अर्ज

या असतील अटी

१) मेडिकल ईमर्जन्सीच्या परिस्थितीत ईपीएफ सदस्य 1 लाख रुपये काढू शकतो.

२) यासाठी रुग्णाला सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागेल.

3) रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाला असेल तर एक अधिकारी त्याचा तपास करेल आणि नंतर रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाची संपूर्ण माहिती जमा करुन एक अर्ज द्यावा लागेल.

४) त्या अर्जात त्याला उपचारात किती खर्च येईल, याचा अंदाज नसून त्याला मेडिकल अँडव्हान्स मिळावा असे नमूद केलेले असावे.

५) हा अर्ज दिल्यानंतर रुग्णाला अथवा त्या कुटुंबातील सदस्याला ही रक्कन एका तासाच्या आत मिळेल.

याबाबत अधिक माहितीसाठी epfindis.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. त्यात तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड टाकून लॉग इन करु शकता. त्यामध्ये ऑनलाईन सेवावर जाऊन तेथे क्लेम फॉर्म 31-19-10 सी आणि 10 डी वर क्लिक करा त्यातील तुमचे बँक खाते चेक करुन त्याच्या अटी आणि शर्ती यावर क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com