Covid 19: देशात पुढच्या महिन्यात येऊ शकते लहान मुलांसाठी कोरोना लस

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Covid 19) शक्यता आरोग्य तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असतानाच, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Vaccination
VaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Covid 19) शक्यता आरोग्य तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असतानाच, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील मुलासांठी ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस देण्यात येणार असल्याची शक्यता आहे , केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय (Union Health Minister Mandvi) यांनी म्हटले आहे. संसदेमध्ये पार पडलेल्या भाजपच्या संसदीय बैठकिमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात खासदारांनी माहिती देताना सांगितेल. या दरम्यान मुलांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत लस देण्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अद्याप जाणवत असताना आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ञाकडून वर्तवण्यात येत आहे. अशातच ही कोरोनाची लस दिलासादायक गोष्ट असणार आहे. सध्या देशामध्ये 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम देशातील लहान मुलांवरही पहायला मिळाला आहे. तिसऱ्या लाटेमध्ये ही संख्या अधिक वाढू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे लहान मुलांना कोरोनाची लस देण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Vaccination
Covid-19: केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना पुन्हा निर्बंध लागू करण्याचे दिले आदेश

भारत बायोटेक कंपनीच्या स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल सुरु आहे. याचा अतिंम निकाल ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत येणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय, जायडस कॅडिलाच्या लसींचा लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रायल करण्यात येत आहे. अशातच तात्काळ मंजूरी देण्यात येऊ शकते. तसेच मॉडर्ना, फायझर सारख्या लसींचेही काम सुरु आहे.

Vaccination
Corona Vaccine: संशोधनशिवाय मुलांना लस देणं घातक- Delhi High Court

लहान मुलांना त्यांच्या वयोमानानुसार कोरोना लसीची तीन टप्प्यांमध्ये चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 ते 18 तर, दुसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वर्षाच्या मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे. कोरोना लसींची मुलांवरील चाचणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यापूर्वी न्यायालयाला केंद्र सराकरने देताना दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com