Covid 19: मुलांनाही मिळणार जगातील पहिली DNA Zycov-D कोरोना लस

मात्र 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vaccination
VaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोना (Covid 19) पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. यातच कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकारकडून युध्दपातळीवर लसीकरणाची मोहीमही राबविण्यात येत आहे. आता कोरोना विरोधातील युध्दामध्ये देशात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु लहान मुलांसाठी कोरोना लस उपलब्ध नसल्याने 18 वर्षाखालील मुलांना अद्याप लस देण्यात आलेली नाही. परंतु आता Zydus Cadila च्या ZyCoV-D या कोरोना लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ZyCoV-D ही लस प्रौढासंह 12 ते 17 वयोगटातील मुलांनाही देता येणार असल्याने आता लहान मुलांनाही ही कोरोनाची लस देण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Vaccination
Indian Army Recruitment: इंजिनीअर्ससाठी मोठी भरती, वेतन ही भरगच्च, असा करा अर्ज

या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या National Technical Advisory Group चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी कोरोना लस 12 ते 17 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या बालकांना येत्या ऑक्टोबरपासून देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. DCGI ने Zydus Cadilaच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही लस लहान बालकांना देण्यात येणार आसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचसोबतच आता शाळा सुरु करण्यासाठी लहान मुलांना कोरोनाची लस देणे आवश्यक असल्याचेही अरोरा यांनी म्हटले आहे.

Vaccination
Indian Army NCC Recruitment 2021: 56 हजारापर्यंत असणार पगार, असा करा अर्ज

दरम्यान, नुकताच आलेल्या सिरो सर्व्हेमध्ये लहान बालकांना कोरोनामुळे गंभीर आजाराचा धोका नसल्याचे दिसून आले असल्याचे अरोरा यांनी यावेळी म्हटले. देशात 18 वर्षे वयोगटातील मुलांची तब्बल संख्या 44 कोटी आहे. त्यामुळे त्यांच्या बौध्दिक विकासासाठी शाळा आता सुरु करणे आवश्यक बनले आहे. देशात 12 ते 18 वर्षे वयोगटातील तब्बल 12 कोटी बालके असल्याची माहिती अरोरा यांनी दिली. त्याचबरोबर यापैकी 1 टक्क्यापेक्षा कमी बालकांना आरोग्याच्या गंभीर समस्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com