Couple Fight Video: राग आला अन् गर्लफ्रेंडनं डोक्यात घातला दांडा! प्रियकर संतापला अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हादरले, पाहा व्हिडिओ

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका जोडप्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Couple Fight Video
Couple Fight VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर सध्या एका जोडप्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १६ सेकंदांचा हा क्लिप विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात असून याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे.

व्हिडिओमध्ये हे दोघेही एका पाळीव प्राण्यासह एका डोंगराळ भागात फिरताना दिसतात. काही क्षणांतच दोघांमध्ये वाद होतो आणि परिस्थिती तणावपूर्ण बनते. त्यानंतर तरुणीने अचानक एका काठीने त्या तरूणावर प्रहार करताना दिसत आहे.

Couple Fight Video
Goa ZP Election: 'सध्या लढा आहे तो भाजप विरुद्ध गोवा असा'! LOP युरींचे मत; काँग्रेस, आरजीपी, फॉरवर्ड निवडणूकीसाठी एकत्र

यानंतर परिस्थिती आणखी चिघळल्याचे फुटेजमध्ये दिसत असून तरुणानेही प्रतिसादादाखल एक दांडा घेत तिच्या डोक्यावर मारला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात उपस्थित पाळीव प्राणी घाबरून पळताना दिसत आहेत. फुटेजमध्ये शेवटच्या क्षणांत तणावग्रस्त स्थिती पाहायला मिळते.

Couple Fight Video
Goa ZP Election: पैंगीणमध्‍ये तिरंगी लढतीची शक्‍यता! राजकीय समीकरणे बदलू लागली; प्रचारात गोवा फॉरवर्डची आगेकूच

इंस्टाग्रामवरील @gharkekalesh या हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. काहींनी हे पाहून धक्का व्यक्त केला असून, सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com