ICMR नवा स्टडी, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका फारच कमी

या अभ्यासात आयसीएमआरने (ICMR) लस घेऊन देखील कोरोनाने संक्रमित झालेल्या 677 लोकांचा अभ्यास केला त्यावेळी त्यांना हे लोक डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झाले असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे शरीरावर होणारे परिणाम यावर इंडियन कांऊसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केला आहे.
कोरोनाच्या लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे शरीरावर होणारे परिणाम यावर इंडियन कांऊसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केला आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनाने (Covid19) संपूर्ण जगात थैमान घातले आहे. संपूर्ण जग मागील एक वर्षापासून कोरोनाशी लढत आहे. अनेक देशांनी लसीकरण मोहीम (Vaccination campaign) सुरु केली आहे. कोरोनाच्या लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे शरीरावर होणारे परिणाम यावर इंडियन कांऊसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केला आहे. याचा अभ्यास करताना लोकांच्या जीनोम विश्लेषणाच्या (genome analysis) आधारावर केला आहे. ज्यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे, त्याबाबतचा अभ्यास करण्यात आला आहे.

या अभ्यासात आयसीएमआरने लस घेऊन देखील कोरोनाने संक्रमित झालेल्या 677 लोकांचा अभ्यास केला त्यावेळी त्यांना हे लोक डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झाले असल्याचे समोर आले आहे. या 677 लोकांमध्ये 17 राज्ये आणि केंद्र शासीत प्रदेश यांमधील लोकांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली. त्यातील 482 लोकांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. तर 29 लोकांमध्ये कोणतीही लक्षणे अढळली नाहीत. या अभ्यासात असेही समोर आले लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यास होणारा मृत्यू दर खूप कमी आहे.

कोरोनाच्या लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे शरीरावर होणारे परिणाम यावर इंडियन कांऊसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केला आहे.
कोरोना संकट आणि ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न

या अभ्यासात सामिल झालेल्या आणि लस घेतलेल्या 71 व्यक्तींनी कोव्हॅक्सीन लस घेतली. तर 604 व्यक्तींनी कोव्हिशिल्ड लस घेतली होती. तर 2 जणांनी चीनची सिनोफार्म लस घेतली. यात फक्त तिघांचा मृत्यू झाला आहे. या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे. 9.8 टक्के लोकांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे. तर केवळ 0.4 टक्के लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लस ही कोरोनावर पूर्णपणे सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना झाला तरी त्यामध्ये मृत्यूचा धोका फारच कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Contract Workers Salary Rules
Girl Accidentally Drinks Acid Kanpur
Lieutenant General NS Raja Subramani New CDS
8th Pay Commission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com