लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Allahabad High Court Ruling: २०१९ मधील दोन लेखापालांशी संबधित खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला.
Allahabad High Court Decision
Allahabad High Court
Published on
Updated on

अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंधांशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काही सामाजिक कारणांमुळे लग्न शक्य नाही, असे सुरुवातीपासूनच माहित असेल, तरीही महिला संमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल, तर त्याला बलात्काराच्या श्रेणीत टाकता येणार नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयाने दिला आहे.

दोन लेखापालांशी संबधित खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. २०१९ मध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलवून अमली पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप महिला लेखापालने केला होता.

या घटनेचा व्हिडिओ चित्रित करुन ब्लॅकमेल केल्याचा आरोपही महिलेने केला होता. संशयिताने लग्नाचे वचन दिले होते पण, चार वर्षानंतर जातीचे कारण देत लग्नाला नकार दिल्याची तक्रार महिलेने दिली होती.

Allahabad High Court Decision
Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दखल केली पण, याबाबत पुढे काही कारवाई झाली नाही. त्यानंतर महिलेने एससी – एसटी विशेष न्यायालयात धाव घेतली. पण, विशेष न्यायालयाने देखील बलात्काराचा गुन्हा दाखल होणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर महिलेने अलाहाबाद न्यायालयात न्यायासाठी याचिका दाखल केली.

संशयित आरोपीने न्यायालयात माहिती देताना पीडित महिलेने पोलिसांना लिखित माहिती देताना त्यांना कोणतीही तक्रार दाखल करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आरोपीने पीडित महिलेकडून दोन लाख रुपये माघारी मागितले त्यानंतर मात्र तिने याचिका दाखल केली, असेही संशयिताने कोर्टात बाजू मांडताना सांगितले.

Allahabad High Court Decision
ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

न्यायालयाने पीडित आणि संशयिताची बाजू ऐकून घेतल्यानंतर याचिका रद्द केली. न्यायाधीश अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या एकल न्यायपीठाने हा निर्णय देताना, सुरुवातीपासूनच सामाजिक कारणांमुळे लग्न शक्य नाही माहित असेल, तरीही महिला संमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल, तर त्याला बलात्काराच्या श्रेणीत टाकता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com