UGCच्या नियमानुसार असा करा क्वाड फेलोशिपसाठी अर्ज

प्रत्येक क्वाड फेलोला 50,000 चे बक्षीस मिळेल. ज्याचा उपयोग शैक्षणिक खर्चासाठी केला जाऊ शकतो.
Quad Fellowship
Quad FellowshipDainik Gomantak
Published on
Updated on

विद्यापीठ अनुदान आयोग, UGC ने क्वाड फेलोशिप संदर्भात एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये, UGC ने भारतीय विद्यार्थ्यांना क्वाड फेलोशिप 2022 कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. UGC ने क्वाड फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज मागवले आहेत आणि विद्यार्थ्यांना या फेलोशिपचा लाभ घेण्यास आणि त्यांचे भविष्य सुधारण्याची संधी देण्यास सांगितले आहे. (Quad Fellowship Registration)

क्वाड फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी, ऑगस्ट 2023 पर्यंत STEM फील्डमध्ये किंवा त्याच्या समतुल्य पदवी धारण करणे आवश्यक आहे. यूजीसीने विद्यार्थ्यांना सांगितले आहे की क्वाड फेलोशिपसाठी अर्ज आणि इतर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

Quad Fellowship
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा

ग्रॅज्युएशन पदवी यूएसए मध्ये उपलब्ध असेल

UGC ने जारी केलेल्या सूचनेनुसार, आयोगाने क्वाड फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज मागवले आहेत, ज्याचा उद्देश भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि यूएस या चार क्वाड देशांपैकी प्रत्येकी 25 अभियंते, गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना एकत्र आणण्याचे आहे. ही फेलोशिप नवकल्पना आणि संशोधनाच्या प्रगतीसाठी कार्य करेल आणि विद्यार्थ्यांना यूएसएमध्ये पदवी मिळवण्यास मदत करेल.

ऑनलाइन अर्ज लवकरच जारी केला जाईल, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. अर्ज करताना, सर्व तपशील आणि कागदपत्रे जसे की बायोडाटा, रेज्यूम आणि शिफारस पत्र इंग्रजीत असावे. वेळेवर सबमिशन करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे शक्य तितक्या लवकर आपल्याजवळ ठेवा. फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी quadfellowship.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Quad Fellowship
भारतीय नौदलाच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, पहा VIDEO

50,000 डॉलचे मिळणार बक्षीस

Quod फेलोशिप क्वाड देशातील 25 विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण 100 विद्यार्थ्यांना दिली जाईल. या अंतर्गत, यूएस मधील आघाडीच्या STEM पदवीधर विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी मिळविण्यासाठी दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रायोजित केले जाईल. प्रत्येक क्वाड फेलोला 50,000 चे बक्षीस मिळेल. ज्याचा उपयोग ट्यूशन, रिसर्च, फी, पुस्तके, राहणीमान आणि जेवण यांसारख्या शैक्षणिक खर्चासाठी केला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com