Narendra Modi Stadium चे नाव बदलणार काँग्रेस, जाहीरनाम्यात दिले मोठे आश्वासन
Narendra Modi Stadium Name Change: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. मात्र काँग्रेसच्या या आश्वासनाची सर्वत्र चर्चा होत आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सरकार आल्यास नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे. या स्टेडियमला सरदार पटेल यांचे नाव देण्यात येणार आहे.
काँग्रेसने ही मोठी आश्वासने दिली
गुजरातसाठी (Gujarat) जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपुष्टात येईल, असे आश्वासन दिले आहे. 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 3000 रुपये बेरोजगार भत्ता दिला जाईल. गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार आहे. 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. प्रत्येक गुजरातीला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे (Farmer) 3 लाखांचे कर्ज माफ होणार आहे. याशिवाय त्यांचे वीज बिलही माफ होणार आहे.
काँग्रेसचे शेतकऱ्यांना आश्वासन
गुजरातमधील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि पिकाला भाव मिळवून देण्यासाठी ‘भाव निर्धार समिती’ स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसने (Congress) दिले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. गरजू विद्यार्थ्यांना 500 ते 20,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल.
दूध उत्पादकांना अनुदान मिळणार
गुजरात काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. 4 लाख रुपये कोविड नुकसान भरपाई दिली जाईल. गेल्या 27 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल. भ्रष्टाचार विरोधी कायदा आणून दोषींना तुरुंगात पाठवले जाईल. मनरेगा योजनेसारखी शहरी रोजगार हमी योजना चालवली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.