सोनिया गांधींनी कुलदीप बिश्नोईंची काँग्रेस पक्षातून केली हकालपट्टी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी कुलदीप बिश्नोई यांची पक्षाच्या सर्व पदांवरुन हकालपट्टी केली आहे.
Kuldeep Bishnoi
Kuldeep BishnoiDainik Gomantak

Rajya Sabha Elections From Haryana: हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग' केल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेश युनिटने ज्येष्ठ नेते कुलदीप बिश्नोई यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने कुलदीप बिश्नोई यांची काँग्रेस कार्यकारिणीतून हकालपट्टी केली आहे. पक्षाचे प्रभारी विवेक बन्सल यांनी यास दुजोरा दिला आहे. (congress president Sonia Gandhi expelled Kuldeep Bishnoi after Rajya sabha cross-voting report)

दरम्यान, पक्षाच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते की, "विधानसभा सदस्य बिश्नोई यांना पक्षातून निलंबित करण्याबरोबरच त्यांना सर्व पक्षीय पदांवरुन काढून टाकले जाऊ शकते." त्यांचे सदस्यत्व काढून टाकण्यासाठी सभापतींकडे शिफारसही केली जाऊ शकते.

बिश्नोई यांनी ट्विट केले

हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्विट केले होते की, ‘फन कुचलने का हुनर आता है मुझे, सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते. सुप्रभात.’

Kuldeep Bishnoi
Rajya Sabha Elections 2022: 4 राज्ये 16 जागा! भाजपचा डाव अन् मविआची लढत

अजय सिंह यादव यांनी ही माहिती दिली

राज्यसभा निवडणुकीत माकन यांच्या पराभवानंतर हरियाणा प्रदेश काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंह यादव यांनीही एक ट्विट केले असून, त्यांनी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांना पाठिंबा देत नसल्याचा स्पष्ट संदेश दिला होता.

Kuldeep Bishnoi
Rajya Sabha Elections: कर्नाटकात भाजपची सरशी, कॉंग्रेसने जिंकली 1 जागा

काँग्रेसला धक्का

हरियाणात (Haryana) काँग्रेसला जोरदार झटका देत भाजपचे कृष्णलाल पनवार आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी पक्षाच्या पाठिंब्याने हरियाणातून राज्यसभेच्या दोन जागा जिंकल्या. निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांच्या विजयाची घोषणा केली. निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन सात तासांहून अधिक उशिराने मतमोजणी सुरु झाली आणि दुपारी दोन वाजता निकाल जाहीर झाला. रिटर्निंग ऑफिसर आर के नंदल यांनी सांगितले की, पनवार यांना 36 मते मिळाली, तर 23 प्रथम पसंतीची मते शर्मा यांच्या खात्यात गेली आणि 6.6 मते भाजपकडे (BJP) हस्तांतरित झाली, त्यांची एकूण मतांची संख्या 29.6 झाली. या निकराच्या लढतीत माकन यांना 29 मते मिळाली, मात्र दुसऱ्या पसंतीचे मत न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com