'गांधी कुटुंबाशिवाय पक्ष चालला': काँग्रेस नेते अश्विनी कुमार

काँग्रेसचे माजी नेते अश्विनी कुमार (Ashwini Kumar) यांनी माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, 'लोकांनी सध्याच्या नेतृत्वाला नाकारले आहे.'
Gandhi family
Gandhi familyDainik Gomantak
Published on
Updated on

पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) माजी नेते अश्विनी कुमार यांनी माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, 'लोकांनी सध्याच्या नेतृत्वाला नाकारले आहे.' (Congress leader Ashwini Kumar has said that the party was running without the Gandhi family)

ते पुढे म्हणाले की, ‘बदल व्हायचे असते तर इतक्या वर्षांच्या पराभवानंतर घडले असते. परंतु दोन्हीपैकी अद्याप काहीही झाले नाही. विशेष म्हणजे मला कोणतेही विधायक बदल होतील असं वाटत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे घराणे, जे म्हणेल तेच अंतिम. असा काँग्रेस पक्षाचा इतिहास राहीला आहे. गेल्या अनेक वर्षांत सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अत्यंत सक्षमपणे केले आहे. त्याआधीही गांधी घराण्यातील सदस्यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लोक सातत्याने काँग्रेसचा पराभव होत आहेत.’

Gandhi family
'ही माझी चूक होती' पंजाबच्या निकालावर सोनिया गांधींची प्रतिक्रिया

तसेच, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, गांधी कुटुंबाने नेतृत्वाच्या भूमिकेपासून दूर जाण्याची आणि दुसऱ्याला संधी देण्याची वेळ आली आहे. 8 वर्षांनंतरही पक्षाच्या अधोगतीची कारणे कळली नाहीत का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com