IT Raid On BBC: 'ही तर अघोषित आणीबाणी', BBC वरील कारवाईनंतर काँग्रेसचा घणाघात

BBC: बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात आयकर विभागाची (आयटी) टीम पोहोचल्याची बातमी आहे.
Jairam Ramesh BBC IT Raid
Jairam Ramesh BBC IT RaidDainik Gomantak

IT Raid On BBC: बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात आयकर विभागाची (आयटी) टीम पोहोचल्याची बातमी आहे. माहितीनुसार, दिल्लीतील केजी मार्ग भागात एचटी टॉवरच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे.

येथे 24 आयटी सदस्यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले असून सर्वांना बैठकीच्या खोलीत बसण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ भागातील बीबीसी स्टुडिओमध्येही आयकर विभागाची टीम पोहोचली आहे. आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करातील अनियमिततेचा आरोप आहे. याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मात्र, या छाप्याबाबत आयकर विभाग किंवा बीबीसीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Jairam Ramesh BBC IT Raid
IT Raid On BBC: 'बीबीसी'च्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर छापे, इन्कम टॅक्स विभागाची कारवाई

काँग्रेस म्हणाले- अघोषित आणीबाणी

काँग्रेसने (Congress) बीबीसी कार्यालयावरील कारवाईचा संबंध पीएम मोदींवरील माहितीपटाशी जोडला आहे. पक्षाने ट्विट करुन याला अघोषित आणीबाणी म्हटले आहे.

पक्षाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले- बीबीसीची पहिली डॉक्युमेंट्री आली, त्यावर बंदी घालण्यात आली. आता आयटीने बीबीसीवर छापा टाकला आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे.

भाजपने म्हटले - काँग्रेसने आरशात पहावे

काँग्रेसच्या वक्तव्यानंतर भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले की, काँग्रेसने आणीबाणीबद्दल तर बोलूच नये. जे वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांनी पहिल्यांदा स्वतः चा चेहरा आरशात पाहावा.

जयराम म्हणाले - 'विनाशा विरुद्ध शहाणपण'

बीबीसी कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले- इथे आम्ही अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी करत आहोत आणि सरकार बीबीसीच्या मागे आहे. 'विनाशाच्या विरुद्ध शहाणपण'.

केंद्र सरकार अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या जेपीसी चौकशीपासून पळ काढत असल्याचा आरोपही रमेश यांनी मंगळवारी केला.

Jairam Ramesh BBC IT Raid
BBC Documentary : बीबीसी डॉक्युमेंटरी म्हणजे भारताविरुद्ध दुर्भावनापूर्ण कृत्य; राज्यपाल श्रीधरन पिल्लई

दुसरीकडे, जयराम रमेश यांचे हे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाखतीनंतर आले आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाला घाबरण्यासारखे काहीही नाही.

रमेश पुढे म्हणाले की, अदानी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी आम्ही आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना पत्र लिहिले आहे.

Jairam Ramesh BBC IT Raid
BBC Documentary On Modi: बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत अमेरिकेने बदलली भूमिका; आधी भारताचे केले होते कौतूक...

दिल्लीचे कार्यालय बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस अंतर्गत चालते

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) वर्ल्ड सर्व्हिस टेलिव्हिजन ही ब्रिटिश सरकारी संस्था आहे. ही 40 भाषांमध्ये बातम्या प्रसारित करते. या संस्थेस यूके संसदेच्या अनुदानाद्वारे वित्तपुरवठा केला जाता.

त्याचे व्यवस्थापन परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयामार्फत केले जाते. हे डिजिटल, संस्कृती, मीडिया आणि क्रीडा विभागांतर्गत काम करते. बीबीसीची सुरुवात 1927 साली रॉयल चार्टर अंतर्गत झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com