देशात महागाईचा भस्मासूर ! सिलेंडरच्या किमतीत वाढ

19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आधी 2253 रुपये होती. आता ही किंमत तब्बल 2355.50 झाली आहे.
Commercial Cylinder Price Hike
Commercial Cylinder Price HikeDainik Gomantak

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर महागाईनं चांगलाच जोर धरला आहे या वाढलेल्या महागाईमुळे सामान्य माणूस मात्र पूर्णपणे भिजून गेला आहे दूध भाजीपाला तेल पेट्रोल सिलेंडर अशा जीवनावश्यक वस्तू मधल्या मध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत सुद्धा वाढली आहे. (Commercial Cylinder Price Hike)

Commercial Cylinder Price Hike
पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! मे महिन्यापासून मिळणार 34% महागाई सवलत

19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आधी 2253 रुपये होती. आता ही किंमत तब्बल 2355.50 झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत वाढल्याने हॉटेलधारकांना याचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 655 रुपये झाली आहे.

19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत रविवारी 102.50 रुपयांनी वाढली आहे, जी पूर्वीच्या 2,253 रुपयांच्या तुलनेत आता 2,355.50 रुपये आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजीच्या दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यासह व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आता 2,253 रुपये असेल.

यापूर्वी 1 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 105 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तेल विपणन कंपन्या उज्ज्वला उत्सव साजरा करण्यासाठी आज देशभरातील 5000 हून अधिक एलपीजी पंचायतींचे आयोजन करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com