पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! मे महिन्यापासून मिळणार 34% महागाई सवलत

गोवा राज्य सरकारने निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई सवलत 28 टक्क्यांवरून वरून 34 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे मान्य केले आहे.
Pension Hike News
Pension Hike NewsDainik Gomatak
Published on
Updated on

गोवा राज्य सरकारने निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई सवलत 28 टक्क्यांवरून वरून 34 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भातील आदेश आता जारी केला आहे की हा भत्ता मे महिन्यात पेन्शनसह वितरित केला जावा.

वित्त अवर सचिव प्रणव भट यांनी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनात जानेवारीपासून जमा झालेली थकबाकी मे महिन्याच्या पेन्शनसह देण्यात येणार आहे, असे नमूद केले आहे. (Big news for pensioners! 34% inflation relief from May)

Pension Hike News
'या' पात्र कुटुंबांनाच मिळणार 3 मोफत सिलेंडर; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती

पेन्शन वितरण प्राधिकरण प्रत्येक व्यक्तीला देऊ करत असलेल्या महागाई सवलतीचे प्रमाण मोजण्यासाठी जबाबदार असेल. केंद्राच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना 1 जानेवारीपासून महागाई रिलीफ (DR) मध्ये 3 टक्के वाढ सूचित केली. त्यानंतर गोवा सरकारने केंद्राचे हे निवेदन स्वीकारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com