Government vs Governer: राज्यपालांना मंत्री म्हणाले, "भाजपचे एजंट असल्यासारखे वागू नका"

मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना ईडीने भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली आहे. तेव्हापासून द्रमुक आणि भाजपमध्ये राजकीय युद्ध सुरू झाले आहे.
DMK Governner Crisis
DMK Governner CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारमधील मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यापासून केंद्र सरकार आणि द्रमुक यांच्यात शब्दयुद्ध सुरू आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मंत्री के पोनुमुदी यांनी राज्यपाल आरएन रवी यांच्यावर निशाणा साधला.

द्रमुक सरकारच्या वतीने सेंथिल बालाजी यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार अन्य कोणाला तरी देण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्याकडे फाइल पाठवण्यात आली होती. जी राज्यपालांनी नाकारली. त्यानंतर स्टॅलिन सरकारमधील मंत्री असलेल्या पोनुमुदी यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना भाजप एजंटसारखे वागू नये असे म्हणाले.

दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती - राज्यपाल

मंत्री पोनुमुदी यांनी सांगितले की, राज्यपालांनी सीएम एमके स्टॅलिन यांच्या वतीने बालाजी यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवल्याबाबतची फाइल रा ज्यपालांनी परत केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात बालाजी यांच्या अटकेनंतर आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पोनुमुदी यांनी सांगितले की, आरएन रवी यांनी फाइलमध्ये दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती आहे म्हणत परत केली.

स्टॅलिन सरकारच्या मंत्र्याने सांगितले की, मंत्री बालाजी आजारी असल्यामुळे सीएम स्टॅलिन यांना त्यांच्या खात्यांचा कार्यभार वाटप करायचा होता, परंतु राज्यपाल आरएन रवी यांनी त्यामध्ये योग्य कारण दिले नसल्याचे सांगत फाइल परत केली. त्यांनी (स्टॅलिन) दिलेली कारणे दिशाभूल करणारी आणि चुकीची आहेत असे, राज्यपालांचे मत आहे.

DMK Governner Crisis
Karnataka Syllabus: शालेय पुस्तकांमधून हटणार हेडगेवार-सावरकर यांच्यावरील धडे

"भाजपच्या एजंटसारखे वागू नका"

स्टॅलिन यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोनुमुदी यांनी या गोष्टी सांगितल्या. या बैठकीत पुन्हा एकदा आर.एन.रवी यांच्याकडे फाइल पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेत मंत्री पोनुमुदी म्हणाले की, आम्हाला वाटते की ते (राज्यपाल) ते मान्य करतील आणि ते भाजपच्या एजंटसारखे वागणार नाहीत.

पोनुमुदी यांनी सांगितले की, आरएन रवी यांनी 31 मे रोजी स्टॅलिन यांना पत्र लिहून बालाजींना मंत्रीपदावरून हटवण्याची विनंती केली होती. सेंथिल बालाजीवर ईडीचा छापा आणि त्याच्या अटकेच्या अनेक दिवस आधी हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. याला प्रत्युत्तर देताना स्टॅलिन यांनी लिहिले होते की, कोणत्याही परिस्थितीत मंत्र्यांचे नाव आले तर त्यांना पदावरून हटवण्याची गरज नाही.

DMK Governner Crisis
ED raids Senthil Balaji: ईडीचा छापा, मंत्र्याची जोरजोरात रडारड आणि आता बायपास सर्जरी; नाट्यमय घडामोडींनी रंगली ईडी ची छापेमारी

तामिळनाडू सरकारचे मंत्री सेंथिल बालाजी यांना 28 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बालाजीवर 2011 ते 2015 दरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या अटकेपासून द्रमुकने तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com