Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

Shocking Viral Video: एक शेतकरी शेताच्या बांधावर विश्रांती घेत होता. कष्टाच्या कामानंतर लागलेल्या गाढ झोपेत असताना अचानक एक विषारी साप त्याच्या शर्टच्या आत शिरला.
Shocking Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Shocking Viral Video: आजच्या डिजिटल युगात लोकांच्या हातात स्मार्टफोन आल्याने कोणत्याही क्षणी घडणाऱ्या घटना तात्काळ कॅमेऱ्यात कैद केल्या जातात. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ पोस्ट होत असतात, परंतु काही व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका शेतकऱ्याच्या जिवावर बेतलेला प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक शेतकरी शेताच्या बांधावर विश्रांती घेत होता. कष्टाच्या कामानंतर लागलेल्या गाढ झोपेत असताना अचानक एक विषारी साप त्याच्या शर्टच्या आत शिरला. ही गोष्ट लक्षात येताच आजूबाजूला असलेल्या लोकांनी तातडीने तिथे धाव घेतली आणि अत्यंत हुशारीने शेतकऱ्याला मदत करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतेय की, एक व्यक्ती अत्यंत हळूवारपणे शेतकऱ्याच्या शर्टची बटणे एक-एक करुन उघडत आहे. यावेळी उपस्थित इतर लोक त्या शेतकऱ्याला अजिबात हालचाल न करण्याचा सल्ला देत आहेत, जेणेकरुन साप चिडून चावा घेणार नाही.

Shocking Viral Video
Viral Video: दारूच्या नशेत जीव धोक्यात! रेल्वे रुळावर पडला तरुण; वेगात ट्रेन आली अन्... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

शर्टची सर्व बटणे उघडल्यानंतर, शेतकऱ्याला (Farmer) अत्यंत सावधगिरीने शर्ट हळूहळू अंगावरुन खाली घसरवण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यानेही कमालीचा संयम आणि समजूतदारपणा दाखवत स्वतःला त्या शर्टपासून वेगळे केले. शर्ट बाजूला होताच आत बसलेला साप स्पष्ट दिसू लागला, ज्याला पाहून उपस्थितांच्या आणि नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आला.

Shocking Viral Video
Bike Stunt Viral Video: 'हिरोगिरी' पडली महागात! स्टंट करताना बाईकचे चाकच निघाले; दोघेही तोंडावर आपटले, थरारक व्हिडिओ व्हायरल

हा धक्कादायक व्हिडिओ 'एक्स' वर '@hemlatajk' नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. "शेतकरी झोपला होता आणि त्याच्या शर्टात कोबरा शिरला, शेती-भाजी सोपे काम नाही," असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले. हा व्हिडिओ पाहताच पाहता 4 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला असून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने "सापाने चावा का घेतला नाही हे पाहून आश्चर्य वाटत आहे" अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने "अशावेळी भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते, पण शेतकऱ्याने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे" असे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com