CM Dhami यांची मोठी घोषणा, उत्तराखंडमध्ये बदलणार गुलामगिरीच्या प्रतिकांची नावे

CM Pushkar Singh Dhami: राज्यातील वसाहतवादाच्या म्हणजेच गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांची नावे बदलली जातील.
CM Pushkar Singh Dhami
CM Pushkar Singh Dhami Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pushkar Singh Dhami: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यातील वसाहतवादाच्या म्हणजेच गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांची नावे बदलली जातील. धामी म्हणाले की, 'राज्यातील सर्व गुलामगिरीच्या प्रतिकांचे पुन्हा नामकरण करण्यात येईल, असे मी निर्देश दिले आहेत. उत्तराखंडमधील रस्ते आणि शहरांची नावे ब्रिटिशकालीन असून ती बदलली जाणार आहेत. वसाहतवादाच्या सर्व प्रतीकांची नावे बदलण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या राज्यातील अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत.'

केदारनाथ, यमुनोत्री यात्रेतून 211 कोटींचे उत्पन्न

धामी यांनी शनिवारी सूरजकुंड येथून परतल्यानंतर हे वक्तव्य केले. सुरजकुंड, हरियाणात (Haryana) राज्यांच्या गृहमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर आणि राष्ट्रीय राजधानीत 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे हे वक्तव्य आले आहे. कर्तव्य मार्गाला पूर्वी 'राजपथ' असे नाव होते.

दुसरीकडे, केदारनाथ (Kedarnath), यमुनोत्री यात्रेतून यंदा उत्तराखंडला 211 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. धामी पुढे म्हणाले की, 'यावेळी चार धाम यात्रा खूप यशस्वी झाली आहे. राज्य सरकारला चांगले उत्पन्न मिळाले आहे.'

CM Pushkar Singh Dhami
Uttarakhand: स्थलांतर रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारचा मेगा प्लॅन

घोडे, खेचर आणि हेलिकॉप्टर सेवेतून बंपर कमाई

गढवाल मंडल विकास निगम (GMVN MD) MD बन्सीधर तिवारी यांनी शुक्रवारी सांगितले होते की, उत्तराखंडने यावर्षी केदारनाथ आणि यमुनोत्री यात्रेतून सुमारे 211 कोटी रुपये कमावले आहेत. केदारनाथ यात्रेदरम्यान घोडे, खेचर आणि हेलिकॉप्टर सेवेतून झालेल्या बंपर कमाईबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बन्सीधर तिवारी म्हणाले की, यावेळी केदारनाथ आणि यमुनोत्री यात्रेत सुमारे 211 कोटींची कमाई फक्त घोडे-खेचर, हेलिकॉप्टर सेवेतून झाली आहे.

CM Pushkar Singh Dhami
उन्हाळ्यात उत्तराखंड फिरायचा प्लॅन करताय? IRCTCने ऑफर केली सुवर्णसंधी

हिमाचल प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार

नोटेवर लक्ष्मी गणेशाचा फोटो लावण्याच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागणीला उत्तर देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले की, केजरीवाल समाजातील एका विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी हे सर्व करत आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी रविवारी हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) प्रचारासाठी जाणार आहेत. ते पुढे म्हणाले की, 'उत्तराखंडप्रमाणे हिमाचल हीही देवभूमी आहे. हिमाचल प्रदेशातही भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com