Bhagwant Mann warns Singers: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गाण्यांमध्ये 'गन कल्चर' आणि 'गँगस्टर कल्चर'च्या जाहिरातीवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही गाण्यात बंदूक आणि गुंड संस्कृती स्वीकारली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. असे करणाऱ्या गायकांवर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
खरे तर पंजाबी गाणी बहुतांशी बंदूक आणि गुंड संस्कृतीला प्रोत्साहन देतात, त्यावर भगवंत मान यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पंजाबी गायकांना इशारा दिला की, त्यांनी या गन क्लचरची जाहिरात करणे थांबवावे. तसेच गाण्यातून कोणत्याही प्रकारे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नये.
पंजाबी आणि पंजाबियतचा आदर करा - भगवंत मान
सीएम भगवंत मान यांनी गायकांना त्यांच्या गाण्यात पंजाब, पंजाबी आणि पंजाबियतचा आदर करण्याचे आवाहन केले. आपल्या गाण्यांद्वारे हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा गायकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आधी अशा गायकांना इशारा दिला जाईल आणि तो मान्य न केल्यास सरकार त्यांच्यावर कडक कारवाई करेल, असे निवेदनात म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर यांचाही विरोध होता
भगवंत मान यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावर डीजी आणि एसएसपी यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मुद्दा मांडला. त्याच वेळी, गेल्या वर्षी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही एका पंजाबी गायकाच्या अटकेला समर्थन दिले होते. ज्याने गाण्यांमध्ये बंदूक आणि गुंड संस्कृतीचा प्रचार केला होता.
दरम्यान ड्रग माफियांवर कारवाई करण्यासाठी पंजाब सरकार आता त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या मोहिमेला वेग देणार आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डीजीपींना दिले आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेवर मी स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरमहा जप्त केलेल्या मालमत्तेचा तपशील देण्याचे निर्देशही त्यांनी डीजीपींना दिले आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी एसएसपी आणि पोलिस आयुक्तांना ड्रग माफियांच्या बड्या माशांवर कारवाई करण्यासाठी एसटीएफशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, आपापल्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यात कोणत्याही हलगर्जीपणासाठी पोलीस अधिकारी थेट जबाबदार असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.