मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले...'पंजाबची तिजोरी नेत्यांसाठी नव्हे तर जनतेसाठी'

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) अनेक मोठ-मोठे निर्णय घेत आहेत.
Bhagwant Mann
Bhagwant MannDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री भगवंत मान अनेक मोठ-मोठे निर्णय घेत आहेत. याच पाश्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले, 'अनेक वेळा निवडणूक जिंकलेल्या आमदार (MLA) आणि माजी आमदारांना प्रत्येक टर्मसाठी पेन्शन मिळणार नाही. फक्त एक टर्म पेन्शन दिली जाईल. त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्येही कपात केली जाणार आहे.' (CM Bhagwant Mann has said that MLAs who have won elections former MLAs will not get pensions every term)https://www.dainikgomantak.com/topic/punjab

मान म्हणाले, 'आता पंजाबची (Punjab) तिजोरी नेत्यांसाठी नव्हे तर जनतेसाठी वापरली जाईल.' यासोबतच भगवंत मान यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केला. पदवीधर असलेले तरुण जेव्हा नोकरीसाठी जातात तेव्हा त्यांच्यावर लाठीहल्ला केला जातो.

Bhagwant Mann
भगवंत मान यांचा मोठा निर्णय, सरकार देणार 25 हजार सरकारी नोकऱ्या !

मान पुढे म्हणाले, बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. मुलं-मुली डिग्री घेऊन जेव्हा जाब विचारायला जातात तेव्हा त्यांच्यावर लाठीहल्ला केला जातो. नोकऱ्या उपलब्ध नाहीत असं सांगितलं जातं. परंतु आम्ही पंजाबमधील या पदवीधारकांसाठी मोठी योजना बनवत आहोत. पण मला तुमच्याशी आणखी एका मुद्द्यावर बोलायचे आहे. आमचे सर्व राजकीय लोक, आमदार… ते लोकांना सेवेची संधी देण्यासाठी हात जोडून मते मागतात मात्र आमदार झाल्यानंतर त्याच जनतेकडे कानाडोळा करतात.

Bhagwant Mann
"माझा वैयक्तिक क्रमांक"; भगवंत मान यांनी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइनची केली घोषणा

लाखो रुपये पेन्शन दिली जाते

ते पुढे म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ''अनेक आमदार ज्यापैकी काही तीनदा जिंकले, हरले, चार वेळा जिंकले, तिकीट मिळाले नाही, पाच वेळा जिंकले, सहा वेळा जिंकले, विधानसभेत आले नाहीत. परंतु त्यांना लाखो रुपयांची पेन्शन मिळते. तेही दर महिन्याला. कोणाला 3.50 लाख तर कोणाला 4.50 लाखांची पेन्शन. कुणाला तर साडेपाच लाखही मिळतात. त्यामुळे तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा बोजा आहे. यापूर्वी इथे आमदार असलेल्या खासदारांचे पेन्शनही अनेकजण घेत आहेत. त्याची पेन्शनही घेतली जात आहे.''

कौटुंबिक निवृत्ती वेतन देखील कापले जाईल

दरम्यान, आज मी पंजाब सरकारच्या वतीने मोठा निर्णय घेणार आहे, असे भगवंत मान म्हणाले. ''आमदाराला दोनदा, पाचवेळा, सात वेळा जिंकायचे असेल, पण पेन्शन फक्त एकाच टर्मसाठी मिळेल. तो किती वेळा जिंकतो हे महत्त्वाचे नाही. त्यामुळे पेन्शनवर खर्च होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तो पैसा जनतेच्या भल्यासाठी खर्च केला जाईल. कारण सेवा करण्यासाठी कोणालाही इतके पेन्शन देणे योग्य नाही. त्याचप्रमाणे त्यांची कौटुंबिक पेन्शनही खूप जास्त आहे. ती ही कमी केले जाईल, अधिकाऱ्यांना यासंबंधीच्या सूचनाही देण्यात आल्याचे मान यांनी यावेळी सांगितले.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com