"माझा वैयक्तिक क्रमांक"; भगवंत मान यांनी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइनची केली घोषणा

पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्याची घोषणा केली.
Bhagwant Mann
Bhagwant Mann Dainik Gomantak

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरु करण्याची घोषणा केली. भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी काल मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि वचन दिले की "एकही दिवस वाया घालवणार नाही". 23 मार्चला स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त हेल्पलाइन क्रमांक सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. (Bhagwant Mann announces anti-corruption helpline)

दरम्यान, ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन क्रमांक माझा वैयक्तिक क्रमांक असेल..जर कोणी लाच मागितली तर त्या क्रमांकावर ऑडिओ आणि व्हिडिओ पाठवा.'

Bhagwant Mann
आप कडून हरभजन सिंगला राज्यसभेची उमेदवारी जाहीर

तसेच त्यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले की, "मी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला धमकावत नाही कारण 99 टक्के सरकारी कर्मचारी प्रामाणिक आहेत. परंतु एक टक्का कर्मचारी भ्रष्ट आहेत, ज्यांनी व्यवस्था खराब केली आहे. ही भ्रष्ट व्यवस्था फक्त 'आप'च साफ करु शकते."

शिवाय, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. एका व्हिडिओ संदेशात भगवंत मान यांनी लोकांना आठवण करुन दिली की, जेव्हा आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) दिल्लीत सत्तेवर आली तेव्हा लोकांना भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ऑडिओ किंवा व्हिडिओ प्रदान करण्यास सांगितले होते. यामुळे दिल्लीतील भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात आल्याचा दावा त्यांनी केला.

भगवंत मान म्हणाले की, ''23 मार्च रोजी स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाईल. पंजाबच्या इतिहासातील ही मोठी घोषणा असणार आहे.'' विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाने 117 विधानसभा मतदारसंघांपैकी 92 जागा जिंकल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com