पुढील पाच दिवस देशात ढगाळ वातावरण,या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस

देशात अनेक भागात कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळत आहे.
Weather Updates
Weather UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या अनेक दिवसांपासून देशात तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) सामना करणाऱ्या दिल्ली-एनसीआरसह (Delhi) अनेक भागातील लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हिमालयावर पश्चिम अडथळा निर्माण झाल्यामुळे हवामानात (Weather Updates) बदल दिसून येत आहे. त्यामुळे अनेक भागात कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळत आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे आणि दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांच्या दाबामुळे आजही पर्वतीय भागात पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. मात्र, उद्यापासून या भागात हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान वेधशाळेनं (IMD) व्यक्त केला आहे.

Weather Updates
प्री-मॉन्सून दाखल! महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना मिळणार दिलासा

आज दिल्लीसह अनेक ठिकाणी हलक्या पावसाची (Rain) शक्यता आहे. मात्र, यामुळे उष्णतेपासून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात 25 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

पुढील 25 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात पुढील पाच दिवस पाऊस पडेल. पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये धुळीचे वादळ किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे.

Weather Updates
उष्णतेपासून मिळणार दिलासा! पुढील 24 तासांत अनेक राज्यांत पावसाची शक्यता

हवामान अंदाजानुसार, पुढील 24 तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, उत्तर किनारी आंध्र प्रदेश, पश्चिम हिमालय, सिक्कीम, हिमालयीन पश्चिम बंगाल आणि पूर्व बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. झारखंड, दक्षिण गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा येथे हलका पाऊस आणि पडू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com